मुंबई

पोहता येत नसूनही चिमुकलीला वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यात घेतली उडी; वाचा २१ वर्षीय तरुणाचा चित्तथरारक अनुभव

भाग्यश्री भुवड


मुंबई : 'घरात पाणी भरल्यामुळे आधीच खुप आवाज सुरु होता. नंतर अचानक जोरात आवाज आला आणि अख्ख घर कोसळताना पाहिल. त्यानंतर घरातील छोटी मुलंही वाहून जाताना दिसली. ती खुप लहान असल्याने त्यांना पोहता येत नव्हतं. धो धो कोसळणाऱ्या पावसात ते बुडत होते. हे केवळ बघत राहणे शक्यच नव्हत. तशीच पाण्यात उडी मारली आणि एका चिमुकलीला वाचवलं',  हा चित्तथरारक अनुभव सांगितला आहे अजय बूटीया या 21 वर्षीय तरुणाने. मंगळवारी ही घटना घडली.

यादिवशी मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अनेक घरात पावसाचे पाणी साचले होते. सांताक्रूझ पुर्व येथील वाकोला नाल्यात तीन घरे कोसळली. एका घराचे छत, दुसऱ्या घराची भिंत आणि तिसऱ्या घराचे तळ व माळा सकाळी 11.30 वाजता संपूर्ण कोसळले. या घरातील मिलिंद काकडे यांचे संपूर्ण कुटुंब नाल्यात वाहून गेले. त्यांची पत्नी रेखा, मुलगी जान्हवी, श्रेया आणि एक अडीच वर्षांची शिवण्ण्या नाल्यात पडल्या. दुदैर्वाने यापैकी तिघांचा मृत्यू झाला. एका मूलीला वाचवण्यात स्थानिकांना यश आले. 

अडीच वर्षाची शिवण्ण्या नाल्यात वाहताना 21 वर्षीय तरुण अजय बुटीया आणि उमेश परब यांना दिसली. हे दोघेही नाल्याच्या पुढच्या बाजूला गेले. मूलगी दिसताच अजय बुटीया या तरुणाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नाल्यात उडी मारली. मुलीला पाण्यातच उचलून घेतले. तिथे उपस्थित असलेल्या स्थानिकांनी तिला वर खेचले. त्यानंतर उमेशने मुलीला तात्काळ 
व्ही. एन. देसाई. रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहचेपर्यंत दुचाकीवर बसलेल्या उमेशने मुलीचे पोट दाबून पोटातील पाणी काढले. रुग्णालयात पोहचल्यावर डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले आणि अखेर शिवण्ण्याला जीवदान मिळाले. दरम्यान, या  घटनेमुळे येथील स्थानिकांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. 

याचे दुःख कायम राहील! 
मला पोहता येत नाही. मनात त्यांना वाचवायचे एवढीच भावना होती. त्यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी पाण्यात उडी मारली.  पण, शिवण्ण्याशिवाय इतर कोणालाही वाचवू शकलो नाही. याची खंत कायम मनात राहील, असे अजयने सांगतिले. हे सांगताना त्याचे डोळे पाणावले होते.

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minister Jayakumar Gore: ‘उन्होंने खुद के गिरेबान में झाँकना चाहिये...’; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा धैर्यशील मोहिते-पाटलांना टोला

Punjab Floods : पंजाबमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात, लासलगावहून ४० टन कांदा रवाना; व्यापाऱ्यांचा पुढाकार

आयुषचा मृतदेह हत्येच्या ३ दिवसानंतरही ससूनमध्येच, अंत्यसंस्काराला इतका वेळ का?

IPS Anjana Krishna: 'आयपीएस अंजना कृष्णा यांना समर्थन वाढू लागले'; उपमुख्यमंत्री अजित पवारांची संभाषणाची क्लिप देशभर व्हायरल

Maratha Reservation : मराठा आरक्षण, १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर २७ मराठा कुटुंबांना मदतीचा दिलासा

SCROLL FOR NEXT