corona-mumbai 2.jpg 
मुंबई

रुग्ण वाढ झाली तरी मुंबईकरांनो लॉकडाउनचं टेन्शन नका घेऊ

दीनानाथ परब

मुंबईत मागच्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी वेगवेगळया उपायोजना करुनही रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. उलट त्यात वाढच होत आहे. रोजच्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या मनात लॉकडाउनची भीती वाढत चालली आहे. मुंबई महानगर क्षेत्रात कोरोनामुळे आतापर्यंत २० हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मुंबई पाठोपाठ ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

विदर्भ, मराठवाड्यानंतर कापडासाठी ओळखले जाणारे मालेगाव शहर कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनले आहे. मालेगावमध्ये दररोज ६१ टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. 

मुंबईत रुग्णवाढ होत असली, तरी लॉकडाउन किंवा नाईट कर्फ्यू लावणार नाही असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले. "मृत्यूदर नियंत्रणात आहे. दरदिवशी आम्ही २४ हजार कोरोना चाचण्या करत आहोत. त्यामुळे नवीन रुग्ण आढळत आहेत" असे त्यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. 

"व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असला तरी तो तितका धोकादायक नाहीय. ज्यांना गरज आहे, त्यांना पुरेशा प्रमाणात बेडस उपलब्ध व्हावेत, याची आम्ही काळजी घेऊ" असे कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष संजय ओक यांनी सांगितले. राज्यात गुरुवारी रुग्ण पॉझिटिव्ह ठरणाचे प्रमाण २१ टक्क्यांवर पोहोचले, तेच प्रमाण मुंबईत १३ टक्के आहे. 

महाराष्ट्रात कोरोनामुळे आतापर्यंत ५३ हजार १३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी ५८ रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मुंबईत ११ हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ११ सप्टेंबर हा पहिल्या लाटेतील सर्वात वाईट दिवस होता. त्यादिवशी राज्यात ४४२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. मुंबईत १० ऑक्टोबरला कोरोनामुळे ४८ रुग्णांनी आपले प्राण गमावले होते. मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हा यंत्रणांना फिल्ड हॉस्पिटल्स सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईत ११ मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mill Workers House: गिरणी कामगारांचे स्वप्न पूर्ण होणार! 'या' जागेवर उंच निवासी इमारती उभारणार; बीएमसीचा मोठा निर्णय

Bride Viral Video: त्याला शेवटचं भेटायचंय... लग्नाच्या २ तास आधी प्रियकराला भेटायला गेली नवरी, पण तिथं नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Latest Marathi News Live Update: नाशिकमध्ये ‘वाईन टुरिझम’ला नवी उभारी; पर्यटन, शेती आणि उद्योगाचा संगम

Movie Review : कैरी - सहजसुंदर अभिनयाला नयनरम्य दृश्‍याचा साज

Shaktipith Expressway : शक्तिपीठ महामार्गावर मोठा ट्विस्ट; फडणवीसांनी जाहीर केली नवी अलायमेंट, सोलापूर, सांगली ते कोल्हापूर नवा मार्ग

SCROLL FOR NEXT