Maharashtra Politics Shiv sena Eknath shinde Bjp establish government devendra fadanvis pravin darekar mumbai Sakal
मुंबई

देवेंद्र फडणवीस 10 तास मुंबईबाहेर; तर शिंदे गटात सत्ता स्थापनेसाठी हालचाली

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातील राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींना आणखी वेग आला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकांनंतर एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे भेटीगाठी वाढल्या आहेत. मोठा राष्ट्रीय पक्ष आपल्या पाठीशी असल्याचं शिंदे यांनी म्हटलं. यानंतर शरद पवार महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. (Maharashtra Politics)

काल दिवसभर पवारांनी बैठका घेतल्या. ते काही काळ मातोश्रीवरही होते. यानंतर काल संध्याकाळी आठच्या सुमारास देवेंद्र फडणवीस त्यांच्या मुंबईतील सागर या बंगल्यावरून एकटेच बाहेर पडले. त्यामुळे सत्तास्थापनेच्या खलबतांसाठी वेग आल्याचं स्पष्ट झालंय. (Devendra Fadnavis Latest News)

काल रात्री सव्वा आठच्या सुमारास फडणवीस एकटेच सागरवरून निघाले होते. मागील दोन दिवसात त्यांनी दिल्लीवारीही केली होती. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. राज्यात सत्तास्थापनेसाठी बैठका झाल्या. त्यामुळे भाजपच्या गोटात हालचालींना वेग आलाय. देवेंद्र फडणवीस 10 तास मुंबईबाहेर होते. आज पहाटे ते सागर बंगल्यावर पोहोचले.

फडणवीस दहा तासात दिल्लीत जाऊन आले. त्यांची ही दुसरी दिल्लीवारी होती. तातडीने राजधातील रवाना होत त्यांनी जेपी नड्डा यांची भेट घेतली. याबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली.

शिंदे गटाच्या नावे सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिंदे वास्तव्यास असलेल्या गुवाहाटीतील हॉटेलमध्ये भाजपच्या काही नेत्यांनी उपस्थितीही लावली. सध्या भाजप नेत्यांशी चर्चेला सुरुवात झाली. आज शिवसेनेची कार्यकारिणी बैठक पार पडणार आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे आज भाजप नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा जुना फोटो काँग्रेस नेत्याने केला व्हायरल; शपथविधी सोहळा अन् जमिनीवर बसलेले मोदी

SCROLL FOR NEXT