मिरा रोड ः रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्यावर पसरलेले खड्ड्यांचे साम्राज्य. (छायाचित्र ः सचिन सावंत)
मिरा रोड ः रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्यावर पसरलेले खड्ड्यांचे साम्राज्य. (छायाचित्र ः सचिन सावंत) 
मुंबई

विकासकामांचे मुद्दे खड्ड्यांमुळे मातीत

सकाळ वृत्तसेवा

मिरा रोड ः मिरा-भाईंदर शहरात सर्वत्र आजही खड्ड्यांचे साम्राज्य असल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर मतदारांकडून समाज माध्यमावर संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय पक्षांच्या विकासकामांविषयी व्हाट्‌सॲप, फेसबुक तसेच ट्विटरवर येणाऱ्या संदेशांवर नागरिकांकडून खड्ड्यांचे दाखले देत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मिरा-भाईंदर शहरात सर्व पक्षीय उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. मिरा-भाईंदर शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे गणेश उत्सवापूर्वी मिरा-भाईंदर महापालिकेकडून खड्डे भरण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला होता; परंतु अतिवृष्टी आणि योग्य नियोजनाअभावी पुन्हा पूर्वीप्रमाणे खड्डे दिसत आहेत. एकीकडे सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असताना नेतेमंडळी मात्र विकास घडवण्याचे आश्‍वासन मतदारांना देत आहेत. त्यामुळे समाज माध्यमावर याविषयी संताप दिसत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी मिरा-भाईंदर रस्त्यावरील काशिमीरा चौकाजवळच्या खड्ड्यामुळे तरुणाला नाहक जीव गमवावा लागला होता. शहरातील सर्व रस्ते खड्डामुक्त करण्याची आश्‍वासने वर्षानुवर्षे सर्व राजकीय पक्षांतर्फे देण्यात आली होती; परंतु अद्यापही सर्वत्र खड्डयांचे साम्राज्य असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. या स्थितीत अद्यापही कोणताही बदल न झाल्याने नेमका कोणता उमेदवार योग्य, असा प्रश्‍न मतदार विचारत आहेत.

नेत्यांनी निवडणुकीत पोकळ आश्वासने देण्याऐवजी शहरातील किमान रस्ते तरी चांगले करावेत.
रुपेश पाटकर, रहिवासी

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अंगदुखीचा त्रास होतो. नेते मात्र प्रचारात दरवर्षी तीच आश्वासने देण्यात मग्न आहेत.
अमित राणे, रहिवासी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT