Devendra fadanvis on aarey car shed metro project ban lifted eknath shinde government  
मुंबई

Aarey Car Shed : बंदी उठवताच, पर्यावरणवादी आक्रमक; फडणवीस म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई मेट्रो (Mumbai Metro) च्या आरे येथील कारशेडचा मार्ग मोकळा झाला असून महाविकास आघाडी सरकारने आरे कारशेड कामावर घातलेली बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे त्यामुळे कारशेड आरे येथे होणार असल्याचं स्पष्ट झालं असून लवकरच कारशेडचे काम पुन्हा सुरु होईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दिली आहे. यानंतर आरे कारशेड विरोधात पर्यावरण प्रेमी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरे कारशेड बद्दल सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत सरकारची भूमिका पुन्हा स्पष्ट केली. (Devendra fadanvis on aarey car shed metro project ban lifted eknath shinde government)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "यापुर्वी देखील संस्थांनी आंदोलन केलं, उच्च न्यायालय, एनजीटीने यांच्या विरोधात निर्णय दिला. नंतर हे सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की, आरे कारशेडमध्ये आपण जेवढी झाडं कापली ती त्यांच्या संपुर्ण आयुष्यात जेवढे कार्बन सिक्वेटेशन करतील तेवढं ही मेट्रो ८० दिवसांत करेल." असे त्यांनी स्पष्ट केलं.

मुंबईकरांसाठी मेट्रोचे महत्व आधोरेखित करत फडणवीसांनी पुढे सांगितले की, मेट्रोमुळे आपण जवळपास दोन लाख मेट्रीक टन एवढं कार्बन उत्सर्जन थांबवणार आहोत. मेट्रोला एक-एक दिवस उशीर करणं म्हणजे, प्रदुषनाच्या माध्यामातून मुंबईकरांचे आयुष्य कमी करणं आहे. या देशात सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं कोणी नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काम सुरु झालं तेव्हा कुठलही आंदोलन नव्हतं, काम २५ टक्के पुर्ण झाल्यानंतर ते काम बंद करण्यात आलं आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, आम्ही पर्यावरणवाद्यांचा आदर करतो, त्यांचं म्हणणं त्यांनी मांडलं पाहिजे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ते काम थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यामागे सदहेतू आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. मुख्यमंत्र्यानी मुंबईकरांच्या हिताकरिता हा निर्णय घेतला आहे. मुंबईकरांना ४० किलोमीटरची लाईफलाईन मिळणार आहे" असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: कोकाटेंचं मंत्रिपद बीडच्या नेत्याला मिळणार? धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का देण्याची तयारी

ICICI Prudential AMC IPO : GMP मध्ये मोठी उसळी! ₹2535 वर उद्या लिस्टिंगची शक्यता; गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी?

Premanand Maharaj: विराट-अनुष्कासारखं प्रेमानंद महाराजांना भेटायचंय? जाणून घ्या खर्च किती

IND vs SA, 4th T20I: धुक्यामुळे सामना रद्द! मग फॅन्सला तिकीटांचे पैसे परत मिळणार की नाही? BCCI चा नियम काय?

Latest Marathi News Live Update : पुण्यात 25 ई डबल डेकर बस

SCROLL FOR NEXT