Devendra Fadnavis News | Uddhav Thackeray News esakal
मुंबई

Devendra Fadnavis: "होय! मी बदलाच घेतला"; ठाकरे सरकार पाडण्यावर अखेर फडणवीस स्पष्ट बोलले

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौफेर भाष्य केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. "होय मी बदलाच घेतला" अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. साम टीव्हीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ठाकरे गटावर विविध प्रकारे भाष्य केलं. (Devendra Fadnavis attack on Uddhav Thackeray again says I took revenge)

फडणवीस म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी स्वतः स्वतःचं नुकसान करुन घेतलंय. उद्धव ठाकरे हे कोणत्या मानसिकतेत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले मला माहिती नाही. त्यांना मुख्यंमत्र्याच्या खुर्चीचा एवढा मोह का झाला हे ही मला माहिती नाही. राजकारणात अनेकदा आपण युती करतो, अनेकदा आपल्याला प्रसंगानुरुप जावं लागतं. पण जेव्हा अनेकदा तुम्हाला त्यांचेच विचार मांडावे लागतात तेव्हा तुम्ही टिकू शकत नाही"

हे ही वाचा : Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

होय मी बदलाच घेतला!

जेव्हा तुमच्यासोबत २४ तास राहणारा व्यक्ती, तुमच्यासोबत सत्ता भोगणारा व्यक्ती आणि तुमच्यासोबत निवडून आलेली व्यक्ती थेट तुमच्या पाठीत खंजीर खुपसते. तेव्हा राजकारणात जिवंत राहून त्याला ते परत करावं लागतं नाहीतर तुम्हाला राजकारणात जगता येत नाही. राजकारणात चांगलंच राहिलं पाहिजे पण तुमच्या चांगुलपणाचा जर कोणी दुरुपयोग करत असेल आणि तुमच्याशी बेईमानी करत असेल तर त्याला जागा दाखवलीच पाहिजे आणि मी ती दाखवली याचा मला अभिमान आहे. जर माझ्यासोबत तुम्ही बेईमानी कराल तर त्याचा मी बदलाच घेईल आणि घेतला, अशा तीव्र शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

ठाकरे गट संपला असं मी म्हणणार नाही

मला असं वाटत नाही की उद्धव ठाकरे गटाला कुठलीच सहानुभूती मिळतेय. पण आपल्या विरोधकांना कधीच कमजोर समजू नये. उद्धव ठाकरे गट संपला असं मी कधीच म्हणणार नाही. कोणीही राजकारणात संपू शकत नाही. जनताच त्यांना संपवू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

Reel star Akkya Bansode: “थांब, तुझा आज गेमच करतो...” पुण्यात रिल स्टारवर धारधार शस्त्राने कसा झाला हल्ला, कोण आहे अक्क्या बनसोडे?

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

SCROLL FOR NEXT