Fadnavis Criticize Uddhav Thackeray esakal
मुंबई

मुख्यमंत्र्यांकडे टोमणे बॉम्ब नावाचं शस्त्र; फडणवीसांचा टोला

मुख्यमंत्री मलिकांचं समर्थन कसं काय करू शकतात, असा प्रश्नदेखील फडणवीस यांनी उपस्थित केला.

निनाद कुलकर्णी

मुंबई : युक्रेन-रशियामध्ये युद्ध सुरू आहे. त्यासाठी युक्रेनच्या अध्यक्षांनी आमच्या मुख्यमंत्र्यांकडून सल्ला घ्यावा. आमच्या मुख्यमंत्र्यांकडे सर्वात मोठं शस्त्र आहे, ते म्हणजे टोमणे बॉम्ब शस्त्र आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. (Fadnavis Criticize Uddhav Thackeray)

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री नवाब मलिकांचं समर्थन कसं काय करू शकतात. मेहबुबा मुफ्तीसोबत तुम्ही गेला असं मुख्यमंत्री म्हणाले. अशा प्रकारच्या आरोपींना फाशी देऊ नये, असे म्हणणारे तुमच्यासोबत बसले होते. मुफ्तींच्या संदर्भात आएसआयने सांगितली, की काश्मीरमध्ये निवडणूक होऊ देणार नाही. त्यावेळी देशाची गरज होती, म्हणून आम्ही मुफ्तीसोबत सरकार बनवले.

आम्ही जगाला दाखवून दिलं की इथं निवडणूक होऊ शकते. दुसऱ्याच क्षणी आम्ही लाथ मारली, तर तुमच्या घरगडी आहेत त्यांना ईडी बोलवत आहे. त्यामुळे ईडी म्हणजे घरडी म्हणता का? मुंबई पोलिस तुमचे घरगडी आहेत का? उद्या कोण परवा कोण तुरुंगात जाणार? हे कोणीची घोषित करू नये. पण, ही अक्कल संजय राऊतांना देणार आहात का?

महाराष्ट्राची बदनामी करू नका, असं म्हणता. पण, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मराठी नाही हे लक्षात ठेवा. मोदींसोबत तुम्ही मतं मागितली. पण, सत्तेसाठी कुठल्या शकुनीच्या नादी लागलात. कोण शीखंडी आहे? शीखंडीला पुढे करणारी ही औलाद नाहीये. समोर लढणारी लोक आहोत. कपटांनी राज्य कौरवांनी घेतलं होतं. पांडवांनी घेतलं होतं. पण पांडव घाबरले नव्हते. आम्ही घाबरत नाही. आम्ही मांडलेल्या गोष्टी पुराव्यानिशी मांडल्या. त्याला उत्तरं मिळालीच नाही. विधानसभेत कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. भाषण विधानसभेतलं होतं, पण ते शिवाजी पार्कवरील झालं, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. तसेच विरोधकांनी सभात्याग केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT