devendra fadnavis jitendra awhad rashmi shukla sitaram kunte 
मुंबई

आता मुख्य सचिवांच्या अहवालावरच देवेंद्र फडणवीसांचे प्रश्न चिन्ह

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केलेल्या अहवालावरून राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. गुप्तचर विभागाच्या तात्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विषयी दिलेल्या माहितीवरून राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात भाजप सरकारला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी शुक्ला यांनी फोन टॅपिंगचा राजकीय हेतूने गैरवापर केल्याचा ठपका कुंटे यांच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. या मुद्द्यावरून काल, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन शुक्ला यांच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. या सगळ्याची दखल घेत आज, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात सीताराम कुंटे यांनी हा अहवाल तयारच केला नाही, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना, पुन्हा राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामात मंत्री थेट हस्तक्षेप करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. फडणवीस म्हणाले, 'सीताराम कुंटे यांच्या अहवालावरून सध्या राज्य सरकार आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, त्या अहवालाविषयी आमच्याकडेही खूप माहिती आहे. ती माहिती योग्य वेळी आम्ही कोर्टात सादर करून. तुर्तास इतकं सांगतो की, हा अहवाल कुंटे यांनी तयार केलाच नाही. अहवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तयार केला. कुंटे यांनी केवळ त्या अहवालावर सही केली. अजूनही त्या अहवालाविषयी आमच्याकडे खूप माहिती आहे.'

मुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अजित पवार काय म्हणाले?
राज्यात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आज पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊन संदर्भात माहिती दिली. त्यावेळी रश्मी शुक्ला यांच्या संदर्भातही पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, 'मीडियाचे प्रतिनिधी म्हणून, तरी किमान तुम्ही कुंटे यांचा अहवाल वाचला पाहिजे. त्यात त्यांनी रश्मी शुक्ला यांच्याविषयी स्पष्ट माहिती दिली आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT