Nawab-Malik-NCP 
मुंबई

"ठाकरे सरकार स्थापन होत असताना रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगचे उद्योग केले"

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: "आमदार फोडता येत नाहीत म्हणून आता अधिकार्‍यांना हाताशी घेऊन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम भाजप आणि देवेंद्र फडणवीस करत आहेत. फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती ही चुकीच्या पध्दतीने सांगण्याचा प्रयत्न केला. फडणवीस यांनी दोन दावे केले. त्याबद्दल बोलायचं तर गृहमंत्री अनिल देशमुख यांची क्वारंटाईन काळात मंत्रालय किंवा सह्याद्री येथे कोणतीही भेट झालेली नाही. दुसरं म्हणजे, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या काळातदेखील फोन टॅपिंग करण्याचा उद्योग त्यांनी केला होता", असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार असल्याचे रश्मी शुक्ला यांनी म्हटले होते. त्यांनी यासंबंधीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडेही पाठवला होता. अशा परिस्थितीत अधिकारी आणि दोषींवर कारवाई करण्याऐवजी रश्मी शुक्ला यांचीच कमी महत्त्वाच्या पदावर बदली करण्यात आली असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्या आरोपांना नवाब मलिक यांनी उत्तर दिलं. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केले होते. त्यांना शिक्षा म्हणूनच एक वेगळे पद निर्माण करुन तिथे त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, असं स्पष्टीकरण मलिक यांनी दिलं.

"महाराष्ट्रात पत्रकार परिषदेची सुरूवात शक्यतो मराठीतून केली जाते, परंतु फडणवीस यांनी मिडियाची माफी मागत हिंदीमध्ये सुरूवात केली. याची कारणेही वेगळी आहेत. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी शरद पवार चुकीची माहिती देत आहेत असा उल्लेख केला. परंतु याबाबत गृहमंत्र्यांनी व मी देखील खुलासा केला आहे. आता ते गृहमंत्र्यांच्या हालचालीबाबत पत्रकार परिषदेत माहिती देतात. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे हालचालींचे पोलीस रेकॉर्ड सादर करतात आणि ते सादर करत असताना ही हालचाल होती की नाही हे मला माहित नाही, असं सांगून भ्रम निर्माण करतात हे योग्य नाही", असं नवाब मलिक नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT