Devendra Fadanvis 
मुंबई

फडणवीस म्हणाले, मोदी 15 लाखांबाबत बोललेच नव्हते; सत्यजीत तांबेनी शेअर केला 'तो' व्हिडिओ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: हिवाळी अधिवेशनाला (Winter session) आज बुधवारपासून (ता. २२) सुरुवात झाली आहे. आज पहिल्या दिवसापासूनच अधिवेशनामध्ये मोठी खडाजंगी होताना दिसून येत आहे. आजचा दिवस गाजला आहे तो नरेंद्र मोदींमुळे! महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मोदींच्या भाषणाची नक्कल केल्याप्रकरणी मोठा गदारोळ झालेला बघायला मिळाला. विधानसभेत टीका करताना शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) नक्कल केल्यानं मोठा गदारोळ माजला. मोदींची नक्कल करताना त्यांनी केलेल्या अंगविक्षेपावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी 'भास्कर जाधव निलंबित करा' अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेलं. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी भारतीयांना 15 लाख देण्याचं दिलेलं वचन देखील आज चर्चेस कारण ठरलं.

आज उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी भाजपच्या नेत्यांना नरेंद्र मोदींनी 15 लाख देण्याच्या आश्वसनाची आठवण करुन दिली होती. 2014 च्या पहिल्या निवडणुकीवेळी प्रचाराच्या भाषणात मोदींनी हा दावा केला होता की, बाहेर गेलेला काळा पैसा मी परत आणेन आणि त्या पैशातून देशातील नागरिकांना 15 लाख रुपये देईन. पंतप्रधान मोदींनी असं वक्तव्य कधी केलंच नाही, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांनी म्हटलं की, देशाच्या पंतप्रधानांसंदर्भात केलेलं हे वक्तव्य चुकीचं असून मोदींनी याप्रकारचा दावा कधीच केला नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

फडणवीसांचा हा दावा किती खोटा आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ आता काँग्रेसचे युवा अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी शेअर केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्याला हवा असलेला व्हिडिओ मी शेअर करतोय, आपण आवर्जून पहा व शेअर करायला विसरु नका, असा खोचक टोला देत त्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

'मोदींचा अपमान खपवून घेतला जाणार नाही'

पंतप्रधान मोदींची भास्करराव जाधव यांनी नक्कल केल्यानंतर मोठा गदारोळ झाला. मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर तो जसा महाराष्ट्राचा अपमान होतो तसा पंतप्रधानांचा अपमान केल्यावर तो देशाचा अपमान होत नाही का? असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधारी पक्षांना केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस भास्कर जाधव यांच्या कृतीवरुन भडकले आणि असा प्रकार खपवून घेतला जणार नाही, असा इशारा दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT