Devendra-Fadnavis-Vaccination 
मुंबई

Coronavirus: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली लस

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. ५० वर्षीय फडणवीसांनी मुंबईच्या जे जे रूग्णालयात लस टोचून घेतली. आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून त्यांनी या संबंधीची माहिती दिली. "मी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस आज मुंबईच्या जे जे रूग्णालयामध्ये घेतला. माझी प्रकृती अत्यंत ठणठणीत आहे", असं ट्वीट त्यांनी केलं. "हे वॅक्सिन पूर्णतः सुरक्षित असून सर्व पात्र व्यक्तींनी लस अवश्य घ्यावी ही माझी सर्वांना विनंती आहे.", असं आवाहनदेखील त्यांनी केलं.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही जे जे रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. लसीकरणाची ही प्रक्रिया खूप सोपी असून जे नागरिक पात्र आहेत त्यांनी न घाबरता लस घ्यावी, अशी विनंती विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

सीरम इन्स्टीट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसींना सध्या भारतात परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी शुक्रवारी सांगितलं की येत्या काही दिवसांमध्ये भारतातील लसीकरणाची मोहीम आणखी व्यापक केली जाईल. लसीकरणाबाबत शक्य तितकी जागरूकता निर्माण केली जाईल, जेणेकरून कोणत्याही लसीसंदर्भात कोणाच्याही मनात शंका राहणार नाही.

महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि कोरोना योद्ध्यांना लसीकरणाचे पहिले डोस दिले जात आहेत. त्याशिवाय, राजकीय नेतेमंडळींनीदेखील लसीचा पहिला डोस घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लस टोचून घेतली. याशिवाय, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रिपाईंचे रामदास आठवले यांनीही लस घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT