Devendra-Fadnavis-CM 
मुंबई

"फडणवीस पुन्हा कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत"

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महाराष्ट्राचे राजकारण सध्या अतिशय तणावपूर्ण आहे. राज्यात शासन विरूद्ध प्रशासन असा संघर्ष सुरू आहे. सुरूवातीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडली. या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा काही दिवसातच संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन यांची हत्या पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी केली असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आणि अखेर दोन विविध तपास यंत्रणांच्या तपासात सचिन वाझे दोषी आढळल्याचे सांगण्यात आले. तशातच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल फडणवीस यांनी मंगळवारी दिल्लीत गृह मंत्रालयाच्या सचिवांची भेट घेतली. या साऱ्या मुद्द्यांमुळे फडणवीस चर्चेत असतानाच ते पुन्हा कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असं विधान करण्यात आलं.

भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात आपली मतं उघडपणे व्यक्त करणारा कॉमेडियन कुणाल कामरा याने फडणवीस यांच्याबद्दल एक ट्वीट केले. मला इतर कोणाच्याही भविष्याबाबत काहीही कल्पना नाही पण एक मात्र नक्की की देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, अशा आशयाचे ट्वीट त्याने केले.

"मृत्यूनंतर आपल्यासोबत काय होतं हे मला माहिती नाही. वेळ ही संकल्पना भविष्यात कशापद्धतीने वापरली जाईल याची मला खात्री नाही. उद्याचा दिवस खरंच उडाजेल का हेदेखील मला माहिती नाही, पण मी एक गोष्ट खात्रीलायक सांगतो की देवेंद्र फडणवीस पुन्हा कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत", असं ट्वीट त्याने केलं.

कुणाल कामराने याआधी अनेकदा भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्या काही निर्णयांविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. बऱ्याचदा त्याला या प्रकरणांवरून लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. मधल्या काळात हिंदू देवदेवतांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्याला लोकांनी मारहाणही केल्याची घटना घडली होती. त्यामुळे कुणाल कामराच्या फडणवीसांबद्दलच्या वादग्रस्त ट्वीटवर जनमानसातून काय प्रतिक्रिया येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT