dhananjay munde Sakal
मुंबई

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचं नाव अन् महिला अधिकाऱ्याचे 25 लाख बुडाले; राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोपीचा दावा

याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करुन एका महिला अधिकाऱ्याची २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आमदार कोट्यातून घर मिळवून देण्याचं आमिष दाखवून ही फसवणूक झाली आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे आरोपींनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचं फसवणूक झालेल्या महिलेला सांगितलं होतं.

नेमकं काय घडलं?

धनंजय मुंडे यांच्या बनावट शिफारसपत्राचा वापर करून महिला अधिकाऱ्याला २५ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. आमदार कोट्यातून घर देण्याचं आश्वासन आरोपींनी या महिला अधिकाऱ्याला दिलं होतं. आमदार कोट्यातून ७५ लाखांचं घर ४५ लाखांत मिळवून देण्याचं आमिष दाखवून विधी खात्यातील एका ३२ वर्षीय महिला अधिकाऱ्याची २५ लाखांची फसवणूक करण्यात आली.

दोन आरोपींवर गुन्हा

जानेवारी २०२१ पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरु होता. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी आमदार धनंजय मुंडे यांच्या बनावट शिफारस पत्राचा वापर केला. याप्रकरणी पोलिसांनी गोविंद गांगण आणि कमलाकर भुजबळ या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यांपैकी गांगण यानं तो राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता असल्याचा दावा केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Manager Work Pressure Death: खळबळजनक! बारामतीत 'Workload'मुळे बँक मॅनेजरने बँकेतच गळफास लावून दिला जीव

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे दोन तास एकाच हॉटेलमध्ये; भेट झाली नसल्याची सूत्रांची माहिती

BMC Election: निवडणुकीनंतर 14 गावे बाहेर काढणार; गौप्यस्फोट करत वनमंत्र्यांनी यादीच दिली

Karad News : विधीमंडळातील मारामारीप्रकरणी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा थेट सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

Rahul Gandhi: ''मोदीजी, 'त्या' पाच लढाऊ विमानांचं सत्य काय?'' राहुल गांधींकडून थेट निशाणा

SCROLL FOR NEXT