मुंबई

क्या बात है! 'मिशन धारावी'नं करुन दाखवलं, 24 तासांत आढळले 'अवघे' इतके रुग्ण

पूजा विचारे

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यातच कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, मुंबईत कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. एकेकाळी धारावी हा परिसर कोरोनासाठी हॉटस्पॉट ठरला होता. मात्र आता धारावीत कोरोना नियंत्रणात आला आहे. रुग्णांची तपासणी करणं, त्यांच्यावर उपचार करणं आणि त्यांना आयसोलेट करणं या उपाय योजनांमुळेच धारावीतील रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

मुंबईतील धारावीत नव्या कोविड १९ रुग्णांचा आकडा हा एकेरी आकड्यात नोंदवण्यात आला आहे. धारावीत रविवारी फक्त ५ नवे रुग्ण आढळून आलेत. या भागात एकूण कोरोना व्हायरसची संख्या २,६१७ वर पोहोचली आहे.

धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत होती. त्यामुळे सगळ्यांना चिंता लागून राहिली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेनं या भागात मिशन धारावी ही योजना राबवली. त्यानंतर त्याचे चांगले परिणाम दिसून आलेत. मिशन धारावीमुळे रुग्णांची संख्या कमी करण्यात यश आलं आहे. 

या परिसरात २,६१७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यात सद्यपरिस्थितीत, ८० अॅक्टिव्ह रुग्ण असून २,२७१ रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा  हॉटस्पॉट ठरल्यानंतर धारावीमध्ये गेल्या महिन्याभरात नवीन कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकरणांची नोंद कमी झाली आहे. 

दादरमध्ये ३१ नव्या रुग्णांची भर पडली असून या भागातील आकडा २,०२० वर पोहोचला आहे. सध्या येथे ४५८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत दादरमध्ये १,४७८ रुग्ण बरे झालेत.

माहिममध्ये गेल्या २४ तासात १७ नवे रुग्ण आढळून आले. येथील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १,८५५ वर पोहोचला आहे. सध्या येथे २७२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत १,५०९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय.

Dharavi COVID 19 five cases coronavirus tally 2617

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT