मुंबई

धारावीत 6 नवे रूग्ण; दादर, माहिममधील कोरोना नियंत्रणाबाहेर?

मिलिंद तांबे

मुंबई: गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोना व्हायरस तळं ठोकून आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मुंबई शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात झालेला दिसतो. मुंबईत कोरोनाचा उद्रेकही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दरम्यान राज्य सरकार हळूहळू मुंबई अनलॉक करत आहे. बऱ्याच प्रमाणात लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल करण्यात आलेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहे. पालिकेच्या अथक प्रयत्नानंतर मुंबईतील कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. त्यातच एकेकाळी हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतही कोरोना नियंत्रणात येत आहे.

धारावीमध्ये आज दिवसभरात 6 नवीन रूग्णांची भर पडली असून एकूण रूग्णसंख्या 2711 इतकी झाली आहे. तर धारावी, दादर, माहिम परिसराचा समावेश असणाऱ्या जी उत्तर विभागात आज 28 नवीन रुग्णांची भर पडली. आता एकूण रूग्णांचा आकडा 7,206 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 413 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

धारावीत केवळ 84 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दादरमध्ये आज 6 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही 2387 इतकी झाली आहे. 407  ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहिममध्ये आज 16 नवीन रुग्णांची भर पडल्यानं रुग्णांची संख्या 2108 इतकी झाली. तर 250 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. संपूर्ण जी उत्तरमध्ये एकूण 741 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

जी उत्तर विभागातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत 28 रुग्णांची भर पडली असून जी उत्तर विभागातील रुग्णसंख्या ही 7,206 वर पोहोचली आहे. जी उत्तर मध्ये कोरोनामुक्त होण्याचा आकडा ही वाढत असून आतापर्यंत धारावीमध्ये 2367,दादरमध्ये 1889 तर माहिममध्ये 1778 असे एकूण 6034 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

(संपादनः पूजा विचारे)

Dharavi Covid 19 Six new cases BMC continue watchlist

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT