मुंबई

Dharavi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन देऊनही सकाळी...; पालिकेच्या कारवाईवर वर्षा गायकवाड संतापल्या

latest Mumbai News: वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन आपली नाराजी व्यक्त केली

Chinmay Jagtap

Latest Dharavi News: मुंबईतील धारावीमध्ये तणावाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. कारण या ठिकाणी एका मशिदीचा अवैध भाग पाडण्यासाठी गेलेल्या मनपाच्या कर्मचाऱ्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी स्थानिक रस्त्यावर उतरले असल्याचे पहायला मिळत आहे.

या विषयी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन आपली नाराजी व्यक्त केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खडेबोल सुनावले आहेत.

यावेळी त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही आज पालिकेने ने बुलडोझर पाठवून कारवाई सुरू केली आहे. धारावीतील लोकांच्या भावना दुखावू नयेत म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना रात्री उशिरा भेटून या कारवाईला थांबवण्याची विनंती केली होती.

मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना विनंती करते की धारावीमध्ये सामाजिक सलोखा आणि शांततेचे वातावरण राखण्यासाठी ही कारवाई स्थगित करण्यात यावी.

सर्व धारावीकर शांतता राखण्यासाठी झटत आहेत. आम्ही प्रशासन आणि पोलिसांशी सतत संपर्कात आहोत. धारावीच्या सामाजिक एकतेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.(Eknath Shinde Dharavi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT