Dharavi Project  Sakal
मुंबई

Dharavi Project : राज्य सरकारकडून धारावी प्रकल्प अदानींना; भाई जगताप, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

धारावी प्रकल्पाचा पुनर्विकास करताना प्रकल्पबाधितांना वाशी, पनवेल येथे हलवले जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

‘धारावी पुनर्विकास प्रकल्प आर्थिक नुकसान सहन करून राज्य सरकारने अदानी समूहाला देऊन टाकला आहे. अदानीचे नाव आल्यावर सरकार इतके नतमस्तक का होते? अदानीवर सरकारची मेहेरबानी का,

असे प्रश्न काँग्रेसच्या भाई जगताप यांनी विचारले. राज्याचे नुकसान करून गरीब धारावीकरांना वेठीस धरण्यात आल्याचा आरोप करत जगताप यांनी गुरुवारी विधान परिषदेत स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली.

भाई जगताप म्हणाले की, २०१८ साली धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम सेकलिंग टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन या कंपनीने ७,२०० कोटी इतकी बोली लावून मिळवले होते. शिवाय यामध्ये रेल्वेच्या मालकीच्या जमिनीचा समावेश देखील नव्हता.

मात्र तोच प्रकल्प आता या सरकारने अदानी समूहाला ५ हजार ६९ कोटी रुपयांना देऊन टाकला. याशिवाय रेल्वेच्या ताब्यात असलेली जमीनही या सरकारने देऊन टाकली. या जमिनीसाठी म्हाडाने ८०० कोटी रुपये दिले. इतकी मेहेरबानी सरकारने अदानीवर केली आहे, असा आरोप जगताप यांनी केला.

अदानींसाठी तरतुदीत बदल

धारावी प्रकल्पाचा पुनर्विकास करताना प्रकल्पबाधितांना वाशी, पनवेल येथे हलवले जाणार आहे. प्रकल्पबाधितांविषयीच्या धोरणानुसार तीन ते चार किमी अंतरावर प्रकल्पबांधितांची सोय केली जावी, अशी तरतूद आहे. मात्र, अदानीसाठी या तरतुदीत बदल केला आहे, असा आरोपही जगताप यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT