मुंबई

शेकडो मुंबईकरांना कोरोनामुक्त करण्यासाठी धारावीकर आले पुढे...

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोना विषाणुचा मुंबईतील पहिला सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेली धारावी झोपडपट्टी आता कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. कोरोनामुक्तिच्या दिशेने वाटचाल करणारे धारावीकर आता शेकडो मुंबईकरांना कोरोनामुक्त करण्यासाठी पुढे आले आहेत. 

स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने धारावीच्या 'कामराज मेमोरियल' शाळेत आयोजित करण्यात आलेल्या 'प्लाझ्मा दान संकल्प अभियाना'ला धारावीतील कोरोनामुक्त नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत मुंबईकरांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. या अभियानातील प्राथमिक चाचणीतील निकषांमध्ये पात्र ठरणारे दाते येत्या 27 जुलैला प्लाझ्मा दान करणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनाचे (27 जुलै) औचित्य साधुन, खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने 'प्लाझ्मा दान संकल्प अभियाना'चे आयोजन करण्यात आले आहे. 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या या अभियानात सहभागी होण्यासाठी, कोरोनामुक्त दात्यांच्या प्राथमिक चाचणीला शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली. खासदार राहुल शेवाळे यांच्या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत धारावी आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 500 कोरोनामुक्त रुग्णांनी प्लाझ्मा दानासाठी तयारी दाखवली आहे. सोशल डिस्टसिंगचे नियम पाळत यातील सुमारे 50 जणांची प्राथमिक चाचणी शुक्रवारी धारावीत झाली. या दात्यांमध्ये धारावीतील नागरिक, पोलिस अधिकारी, डॉक्टर्स आणि शिवसेना पदाधिकारी यांचा समावेश होता. 

मुख्यमंत्र्यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या 'प्लाझ्मा दान संकल्प अभियाना'ला मोठा प्रतिसाद देत धारावीकरांनी पुन्हा एकदा मुंबईकरांची मने जिंकली आहेत. मुंबईतील ज्या कोरोनामुक्त बंधू-भगिनींना या अभियानात सामील होण्याची इच्छा असेल त्यांनी जवळच्या शिवसेना शाखेशी किंवा 9321586566 या आमच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा खासदार असं राहुल शेवाळे म्हणालेत. 

प्लाझा दान कोण करू शकतं ?

18 ते 55 वर्षे वयाच्या ज्या नागरिकांनी कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे आणि ज्यांचा कोरोना बरा होऊन कमीत कमी 28 दिवस झाले आहेत अशा दात्यांच्या रक्ताची प्राथमिक तपासणी केली जाते. यामध्ये दात्याला कोणताही गंभीर आजार नाही ना, तसेच इतर निकषांची खात्री करूनच त्यांना प्लाझ्मा दान करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. 

शुक्रवारपासून 500 जणांची रक्त तपासणी

धारावीतील 2 हजार 100 रुग्ण बरे झाले आहेत. धारावीकर बरे झाले आता त्यांनी इतरांनाही बरे करावे, असे म्हणत महापालिकेने त्यांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, शुक्रवारपासून 500 जणांची रक्त तपासणी धारावीतील कामराज स्कूल 90 फुटी रस्ता येथे सुरु झाली. - किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त, जी उत्तर विभाग

dharavikar are coming together to save covid positive mumbaikar by plasma donation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT