dhirendra maharaj 
मुंबई

Dhirendra Shashtri: धीरेंद्र शास्त्रींचा कार्यक्रम रद्द होणार? आयोजकांना पोलिसांची नोटीस

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आज मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आज मुंबईत आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी धीरेंद्र शास्त्री मुंबईत दाखल झाले आहेत. पण त्यांचा कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण पोलिसांनी या कार्यक्रमाच्या आयोजकांना नोटीस पाठवली आहे. (Dhirendra Shastri todays program may be cancelled Mumbai Police gives notice to organizers)

एएनआयच्या ट्विटनुसार, मीरा रोड इथं धीरेंद्र शास्त्रींचा कार्यक्रम होणार आहे. पण या कार्यक्रमाला काँग्रेस आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं विरोध केला आहे. अंनिस तर पोलिसांत यांप्रकरणी तक्रार दिली आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आयोजकांना सीआरपीसी कलम १४९ अंतर्गत नोटीस पाठवली आहे.

नक्की वाद काय?

धीरेंद्र महाराज हे आपल्याला दिव्यशक्ती प्राप्त असल्याचा दावा करतात. पण अशा प्रकारे कोणालाही दिव्य़शक्ती प्राप्त होऊ शकत नाही. ही केवळ धूळफेक असून याद्वारे अंधश्रद्धेचा बाजार मांडून भाविकांची फसवणूक केली जात असल्याचा दावा अंनिसनं केला आहे. हातचलाखी आणि विशिष्ट पद्धतीच्या टेक्निकचा वापर करुन धीरेंद्र शास्त्रींप्रमाणं कोणीही प्रशिक्षित व्यक्ती हे करु शकतो, असंही अंनिसं म्हणणं आहे. त्यामुळं अंनिसनं या कार्यक्रमाला विरोध केला आहे.

यापूर्वीही नागपूर इथं महिन्याभरापूर्वी धीरेंद्र शास्त्रींच्या दिव्यशक्तीच्या कार्यक्रमावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी विरोध केला होता. तसेच धीरेंद्र शास्त्रींनी हा चमत्कार करुन दाखवावाच असं आव्हानही दिलं होतं. त्यानंतर देशभरात मोठा गदारोळ माजला होता. अनेकांनी अंनिस हिंदू विरोधी असल्याचं सांगत धीरेंद्र महाराज यांचं समर्थन केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT