मुंबई

आवाजावरून होणार कोरोनाचे निदान; नेस्कोच्या कोव्हिड सेंटरमध्ये लवकरच प्रयोग

भाग्यश्री भुवड

मुंबई :  व्यक्तीच्या ध्वनी लहरींवरुन म्हणजेच आवाजावरून कोरोनाचे निदान करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून गोरेगाव येथील नेस्को कोव्हिड सेंटरमधील रुग्णांवर हा प्रयोग केला जाणार आहे. 4 भाषांमध्ये ही चाचणी केली जाणार आहे.

व्होकलिस हेल्थ अँड इनोव्हंट हेल्थकेअर आणि पालिका यांच्यात शनिवारी याबाबतचा सामंजस्य करार झाला आहे. करारावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या ऑनलाईन स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या आहेत. 

आवाजाच्या चाचणीमुळे व्यक्ती कोरोना बाधित आहे की नाही, हे 30 सेकंदात समजू शकणार आहे. या चाचणीत जे पॉझिटिव्ह आढळतील त्यांचे आरटीपीसीआर चाचणीने निदान पक्के केले जाईल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन 2000 व्यक्तींवर अभ्यास केला जाईल. या सर्व प्रक्रियेला किमान दोन ते तीन महिने लागतील, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.  

हिंदी, मराठी, इंग्रजी आणि गुजराती या चार भाषांमध्ये ही चाचणी केली जाणार आहे. प्रत्येक भाषेचे वेगवेगळे आवाज आहेत. त्यामुळे, भारतीयांच्या आवाजातील आणि भाषांमधील माहिती त्या उपकरणात भरली जाणार आहे. कोव्हिड रुग्णांचे सर्व नमुने, लक्षणे, स्वाब रिपोर्ट, एक्स रेदेखील त्या उपकरणात भरली जाणार आहेत. अमेरिका आणि इस्त्राईल सारख्या अनेक देशांमध्येही या चाचणीचा वापर होत आहे. 

कोव्हिड -19 ची लक्षणे दिसू लागल्यानंतर व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होतो. या सर्व प्रक्रियेत फुप्फुसाच्या स्नायूंवरही परिणाम होऊन त्यांना सूज येते. त्याचा परिणाम आवाजावर होऊन रुग्ण बोलतो तेव्हा हे बदल जाणवतात. याच बदललेल्या आवाजाला मोजण्यात येतो आणि त्यातून व्यक्तीला कोरोना झाला आहे की नाही, याचे निदान होते. 
- डॉ. नीलम अंद्राडे,
प्रमुख, नेस्को कोव्हिड सेंटर

अशी होईल चाचणी
संशयिताने एका व्हॉईस अ‍ॅप्लिकेशनवर किंवा लॅपटॉपवर काही क्रमांक बोलायचे आहे. आवाजाचे हे नमुने संकलित केले जातील. त्यानंतर, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून 30 सेकंदात अहवाल मिळून व्यक्ती किती जोखमीची आहे, हे कळू शकेल, असे डॉ. अंद्राडे यांनी सांगितले.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली ! सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती देण्याचा आदेश

Psychological Facts About Dreams: स्वप्नात नेहमी Ex Partner दिसतो? एकच व्यक्ती वारंवार दिसण्यामागे असू शकतं 'हे' कारण

Air India च्या विमानाने उड्डाण घेताच इंजिनमध्ये बिघाड, दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं Emergency Landing ; अहमदाबाद अपघाताची पुनरावृत्ती टळली!

Latest Marathi News Live Update : संजय राऊतांची राज ठाकरेंशी भेट; शिवतीर्थवर २० मिनिटांची चर्चा

Pune Kho-Kho Team: पुण्याचे संघ दोन्ही विभागांत अंतिम फेरीत; राज्य अजिंक्यपद खो-खो, धाराशिव, मुंबई उपनगरही फायनलमध्ये

SCROLL FOR NEXT