Did support prevent action dcm Devendra Fadnavis question to Sharad Pawar politics esakal
मुंबई

Mumbai : कारवाई टाळण्यासाठी पाठिंबा दिला का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवारांना सवाल

‘सक्तवसुली संचालनालय (ईडी) तसेच प्राप्तिकर खात्याची कारवाई होईल, या भीतीने आमचे आमदार भाजपत गेले’

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘सक्तवसुली संचालनालय (ईडी) तसेच प्राप्तिकर खात्याची कारवाई होईल, या भीतीने आमचे आमदार भाजपत गेले’ या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ मध्ये आम्हाला पाठिंबा देऊ केला होतात, तो कोणत्या कारणामुळे, असा सवाल केला आहे.

‘पवारसाहेब कोणत्या कारवाईला घाबरून येत होते, हे त्यांनीच सांगावे’, असा प्रश्नही फडणवीस यांनी केला. ते म्हणाले, की २०१९ मध्ये भाजप-शिवसेनेचे सरकार गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रमुख या नात्याने पवारसाहेबांनी आम्हाला पाठिंबा दिला होता, तो कोणत्या कारवाईच्या भीतीमुळे? २०१९ च्या आधी २०१७ मध्येही पवारांनी भाजपला पाठिंबा देऊ केला होता. तेव्हा कोणत्या कारवाईची भीती होती?

फडणवीस खोटारडे नेते

देवेंद्र फडणवीस हे खोटारडे नेते आहेत अशी टीका ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे. दिल्लीतील राजकारणाचे ते बळी ठरताहेत, याचे वाईट वाटते असेही राऊत म्हणाले. भाजपने हा आरोप खोडून काढला आहे. फडणवीस हे चोरांना ठिकाणावर आणणारे नेते आहेत, असे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Islamabad Express Accident : पाकिस्तानमधील लाहोरजवळ रेल्वेचा थरार! इस्लामाबाद एक्सप्रेसचे 10 डबे रुळावरून घसरले, 30 प्रवासी जखमी

Lt General Vinod Khandare : देशात राहून शत्रूंना मदत करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांचे वक्तव्य

लिपिकाला पगार १५ हजार, ३० कोटींची प्रॉपर्टी; २४ घरं, ४० एकर जमीन अन् सोन्या चांदीचं घबाड

Kangana Ranaut: एक शेतकरी नडला 'कंगना'ला भारी पडला... उच्च न्यायालयाकडून मोठा झटका! खटला रद्द करण्यास नकार; जाणून घ्या प्रकरण?

Shardul Thakur: शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभागाचा संघ सज्ज; श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, अनुभव आणि युवा जोशाचा मेळ

SCROLL FOR NEXT