मुंबई

पालिका दवाखान्यांत आहारतज्ज्ञ 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - शहरात मधुमेह, लठ्ठपणा आदी आजार वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या 127 दवाखान्यांमध्ये आहारतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व दवाखाने आणि उपनगरी रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारच्या प्राथमिक चाचण्या होणार आहेत. "आपली चिकित्सा' योजनेअंतर्गत अशी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढील 15 दिवसांत सुविधा सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 

उच्चभ्रूंमध्ये आढळणारे जीवनशैलीचे आजार काही वर्षांत अल्प उत्पन्न गटांमध्येही दिसू लागले आहे. पूर्वी कामगार वर्गाच्या वस्त्यांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह आदी आजारांच्या रुग्णांचे प्रमाण दुर्मिळ होते; मात्र काही वर्षांतच अशा आजाराने ग्रस्त रुग्ण तिथे मोठ्या प्रमाणात आढळू लागले आहेत. महापालिकेच्या दवाखान्यांत प्राथमिक उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये असे आजार आढळू लागले आहेत. पालिकेने त्याची दखल घेतली आहे. त्यासाठी 127 दवाखान्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने आहारतज्ज्ञ नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पालिकेच्या दवाखान्यांमध्ये आणि उपनगरी रुग्णालयांमध्ये अनेक प्रकारच्या रक्त चाचण्या होत नाहीत. वैद्यकीय निदानासाठी लागणाऱ्या काही प्राथमिक चाचण्याही होत नाहीत. त्यावर उपाय म्हणून खासगी संस्थांच्या मदतीने सर्व प्रकारच्या प्राथमिक चाचण्यांची सोय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

पालिकेचे दवाखाने - 175 
आहारतज्ज्ञ नियुक्त करणार - 127 
सर्व प्रकारच्या चाचण्या - 175 

दवाखान्यांमध्ये रक्ताबरोबरच इतर प्रकारच्या प्राथमिक चाचण्या करून देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. निविदाप्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच चाचण्या करण्याची सुविधा सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आजारांचे निदान लवकर होऊन त्यानुसार उपचार वेगाने सुरू करता येतील. त्याचबरोबर कंत्राटी पद्धतीने आहारतज्ज्ञही नियुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
सुनील धामणे, उपायुक्त (वैद्यकीय) 

62 लाख 74 हजार रुग्णांचा आढावा 
पालिकेच्या डॉक्‍टरांच्या पथकाने 175 दवाखान्यांत उपचारांसाठी आलेल्या रुग्णांचा आढावा घेतला होता. सुमारे 62 लाख 74 हजार रुग्णांचा आढावा घेण्यात आला. त्यात श्‍वसन विकार, ताप, डायरिया, मधुमेह आणि अतिताणाचे रुग्ण सर्वाधिक होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT