मुंबई

बदलत्या जीवनशैलीमुळे गर्भधारणेत अडचणी; ‘पीसीओएस’ आजाराचे प्रमाण वाढले 

भाग्यश्री भुवड


मुंबई : बदलत्या जीवनशैलीचा दुष्परिणाम अनेक महिलांमध्ये दिसू लागले असून गर्भधारणेसंबंधित आजार वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यात पीसीओएस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरिअन सिण्ड्रोम या आजाराचे प्रमाण वाढत आहे. 

गेल्या काही वर्षांत पीसीओएस असलेल्या स्त्रियांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे त्यामुळे हा आजाराकडे गंभी समस्या म्हणून पाहणे आणि योग्य वेळी   उपचार करणे ही काळाची गरज आहे. गर्भधारणा न होणे अशा तक्रारी घेऊन येणा-या प्रत्येक तिस-या महिलेस पीसीओएसची समस्या असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.  18 ते 35 या वयोगटातील 20 ते 30 टक्के महिला या सारख्या आजाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे. 

पीसीओएस म्हणजे काय ?  
पॉलिसिस्टिक ओव्हरिअन सिण्ड्रोम (पीसीओएस) या अवस्थेमध्ये अंडाशयात छोटी पाण्याने भरलेली गळवे (सिस्ट) मोत्याच्या आकारात चिकटलेली असतात. याशिवाय हार्मोन्सचे असंतुलन दिसून येते. पुरुषांमध्ये आढळणाऱ्या हार्मोन्सचे प्रमाण स्त्रियांमध्ये वाढते आणि इन्सुलिनच्या चयापचयावर वाईट परिणाम होतात. मासिक पाळी अनियमित होते आणि रक्तस्रावही कमी होतो. 

पीसीओएसनंतर या आजारांची ही शक्यता  
पीसीओएसग्रस्त स्त्रियांना पुढील आयुष्यात वंध्यत्व, हायपरलीडिमिया, हृदयविकार तसेच रक्तदाब हे विकार जडण्याचा धोका अधिक असतो. पीसीओएसने ग्रासलेल्या स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचा दर जास्त असतो.  
बैठी जीवनशैली, तणाव, अनियमित आणि चुकीच्या आहाराच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव या कारणांमुळे हा आजार होतो.
...........
अशी घ्या काळजी 
गर्भारपणातील मधुमेह आणि अकाली प्रसूती हे पीसीओएस चे आणखी काही दुष्परिणाम आहेत.  गर्भारपणात मेटफोर्मीन घेण्याचा सल्ला डॉक्टर घेऊ शकतात. त्यामुळे गर्भपाताची शक्यता कमी होते. पीसीओएस असलेल्या गर्भवती स्त्रीला नियमित व्यायामाची गरज असते. हलके व्यायाम केल्याने इन्सुलिनचा वापर शरीर करू लागते, त्यामुळे संप्रेरकांचे संतुलन होते आणि वजन नियंत्रित राहते. चालणे आणि हलके व्यायाम हे गर्भवती स्त्रीसाठी सर्वोत्तम व्यायाम प्रकार समजले जातात. पीसीओएस असलेल्या गर्भवती स्त्रीचा आहार सुद्धा महत्वाचा आहे. प्रथिने आणि तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात घेल्यास गर्भारपणात इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहते, असे नोव्हा आयव्हीएफ फर्टीलिटीच्या फर्टीलिटी सल्लागार डॉ. रितु हिंदुजा यांनी सांगितले आहे.

पीसीओएस व्याधीग्रस्त महिलेने बाळाला जन्म देणे आणि गर्भधारणा होणे जोखमीचे असू शकते. फर्टीलिटी एक्स्पर्टकडे उपचारासाठी येणार्‍या प्रत्येक तिस-या महिलेस पीसीओएसची समस्या असते. महिलांमध्ये लठ्ठपणा सारखी समस्या देखील दिवसेंदिवस वाढत चालली असून हे देखील पीसीओएस सारख्या आजारास कारणीभूत ठरत आहे. योग्य बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) 25 असतो. मात्र, बीएमआय 27-28 च्या वर जातो आणि ही चिंताजनक होते आणि अशा व्यक्ती लठ्ठपणासारख्या आजाराने ग्रासतात. पीसीओएस ही आयुष्यभर आरोग्याची स्थिती आहे परंतुसारख्या आजारापासून दूर राहण्यासाठी अचूक जीवनशैली, संतुलित आहार, शारीरिक हालचाली आणि वजन नियंत्रणात असणे गरजेचे आहे, असे नोव्हा आयव्हीएफ फर्टीलिटी सल्लागार डॉ. भारती ढोरे-पाटील यांनी सांगितले.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT