digha sakal
मुंबई

Digha Gao Railway Station: दिघा स्थानक झाले सुरु मात्र असंख्य त्रूटींमुळे नागरिकांना सहन करावा लागु शकतो त्रास

सकाळ वृत्तसेवा

सकाळ वृत्तसेवा : दिघागाव रेल्वे स्थानक सुरु होण्यापूर्वी प्रवाशांना ऐरोली किंवा ठाणे रेल्वे स्थानकांमधून द्राविडी प्राणायम करत प्रवास करावा लागत होता. अनेक वेळा रिक्षाने ऐरोली, ठाणे रेल्वे स्टेशन गाठावे लागत असल्याने प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत होती. पण दिघा स्थानकामुळे आता हा प्रवास अधिक सुखकर झाला आहे. पण स्थानकातील त्रूटी भविष्यात त्रासदायक ठरणार आहेत.


दिघा गाव रेल्वे स्थानक ठाणे-बेलापूर मार्गावरूनच प्रवेशद्वार असल्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत अधिक त्रासदायक ठरणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांमध्ये दोन्ही बाजूने प्रवाशांना बाहेर जाण्यासाठी मार्गिका ठेवण्यात आल्या आहे.

पण दिघागाव रेल्वे स्थानकामध्ये फक्त ठाणे-बेलापूर मार्गावरूनच प्रवेश आहे. त्यामुळे गणेश नगर, साठेनगर, बंदुमाधव नगर, संजय गांधी नगरच्या प्रवाशांना ठाणे-बेलापूर मार्गाने द्राविडी प्राणायाम करत रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेश करावा लागत आहे.

वाहन पार्किंगचा प्रश्न
दिघागाव रेल्वे स्थानक परिसरामध्ये चारचाकी व दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. स्थानकांच्या उत्तर व दक्षिण बाजूस प्रवाशांना मार्गिका ठेवण्यात आलेली आहे. पण चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी कोणतीच सोय करण्यात आलेली नाही. तर रेल्वे स्थानकांच्या आवारांमध्येच दुचाकींसाठी पार्किंगची सोय करण्यात येणार असल्याचा दावा केला जात आहे. पण सद्यःस्थितीत पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

प्रवेशद्वारावर कोंडीचे विघ्न
दिघागाव रेल्वे स्थानकांचा प्रवेशद्वार हा ठाणे बेलापूर मार्गाजवळ असल्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होण्यास सुरुवात झालेली आहे. या परिसरांमध्ये पादचाऱ्यांसाठी पादचारी पूल नसल्यामुळे जीव मुठीत धरुन रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यातच संत निरंकारी चौकांमध्ये पटणी रस्त्याकडे जाणारी वाहने कळव्याकडे जाणारी वाहने तसेच दिघाकडे जाणाऱ्या वाहनांमुळे या चौकांमध्ये वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झालेली आहे.

दिघा गाव रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांकडून आत्तापासून जागा अडवण्यासाठी धडपड सुरु झालेली आहे. त्यामुळे पालिकेकडून देखील जागा अडवण्याच्या प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. तर भविष्यात जागा अडवणाऱ्यांवर पालिका कारवाई करणार आहे.
- डॉ.कैलास गायकवाड, विभाग अधिकारी, दिघा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT