Dilip Kumar hospitalised 
मुंबई

अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु

शर्वरी जोशी

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्वास घेतांना त्रास होत असल्यामुळे सकाळी ८.३० वाजता त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. याविषयी अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी माहिती दिली आहे. (dilip-kumar-admitted-to-hinduja-hospital-at-mumbai)

"दिलीप कुमार यांनी श्वास घेतांना त्रास जाणवत होता. त्यामुळे आज सकाळी ८.३० वाजता त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं आहे. हे एक नॉन कोविड रुग्णालय आहे. डॉ.जलील पारकर यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरु आहेत. तुमच्या सगळ्याची प्रार्थना सोबत असल्यामुळे ते लवकरच बरे होतील", असं सायरा बानो यांनी एका मुलाखतीत सांगितलं.

गेल्या वर्षभरामध्ये दिलीप कुमार यांना प्रकृती खालावल्यामुळे बऱ्याचदा रुग्णालयात दाखत करण्यात आले होते. दिलीप कुमार आणि अभिनेत्री सायरा बानो हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन कपल म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे दिलीप कुमार यांच्या आजारपणात सायरा बानो या त्यांची प्रचंड काळजी घेत असल्याचं पाहायला मिळतं.

दरम्यान, जवळपास सहा दशकांपेक्षा जास्त काळ दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली आहे. ‘मधुमती’, ‘देवदास’, ‘मुघल-ए-आझम’, ‘राम और श्याम’, ‘कर्मा’ आणि अशा अनेच चित्रपटातून दिलीप साहेबांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT