Dilip-Kumar
Dilip-Kumar file image
मुंबई

#DilipKumar : रूपेरी नभांगणातला लखलखता तारा निखळला!

विराज भागवत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा, रूपेरी नभांगणातला एक लखलखता तारा निखळला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. वयाच्या 98 व्या वर्षी दिलीप कुमार यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून श्वासोच्छवासाला त्रास होत असल्याने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली. अजरामर भूमिका साकारणारे, दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामर राहील, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. (Dilip Kumar Passes Away CM Uddhav Thackeray Dy CM Ajit Pawar pays tribute)

शोकसंदेशात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...

Uddhav Thackeray

भारतीय चित्रपट सृष्टीच्या लौकिकात भर घालणारी, त्याला सातासमुद्रापार नेणारी अशी दिलीप कुमार यांची कारकिर्द आहे. त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिकांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. नेहमीच्या जगण्यातही त्यांनी आपल्या व्यक्तीमत्त्वाप्रमाणे चित्रपटसृष्टीचा रूबाब वागवला आणि वाढवला. मेहनतीच्या जोरावर कला क्षेत्रात स्थान निर्माण करता येते, असा संदेश देणारी त्यांची वाटचाल होती. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा स्नेहबंध होता. कला क्षेत्राविषयीची आत्मियता हा अतूट धागा या दोघांमध्ये होता. अजरामर भूमिका साकारणारे चतुरस्त्र अभिनेते दिलीप कुमार यांचे चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातील स्थानही अजरामरच राहील. त्यांच्या निधनामुळे रूपेरी नभांगणातील एक लखलखता तारा निखळला आहे. ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

पार्थिवाचे मुख्यमंत्र्यांकडून अंत्यदर्शन

दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेतले व कुटुंबीयांचे सांत्वन केले. दिलीप कुमार यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. मुख्यमंत्र्यांनी दिलीप कुमार राहत असलेल्या खार येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शनही घेतले. या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर त्यांच्यासोबत उपस्थित होते.

शोकसंदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले...

Ajit Pawar

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद असून त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीचा दीपस्तंभ ढासळला आहे. अनेक पिढ्यांच्या, कोट्यवधी चित्रपटरसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा 'ट्रॅजेडीकिंग' काळाच्या पडद्याआड गेला आहे. प्रत्येक अभिनेत्याचं 'दिलीपकुमार' बनण्याचं स्वप्न असायचं, ते स्वप्न दाखवणारा जादूगार आज स्वतःच अदृश्य झाला आहे. आभाळाएवढ्या उंचीच्या शतकातील या महान कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली!

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात...

दिलीप कुमार यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूपच वाईट वाटले. सिनेसृष्टीने आज एक दिग्गज अभिनेता गमावला आणि मी आज वडिलधाऱ्या स्नेही व्यक्तिला मुकलो. अखंड सेवा करण्याचे काम त्यांनी केलं. मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना करतो. कुटुंबीयांना धीर देण्यासाठी नक्कीच सर्व चाहता वर्ग साथ देऊ. त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रति सहवेदना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT