Sambhaji bhide Walse patil Sakal
मुंबई

चार्जशीटमधून भिडेंचं नाव का वगळलं; गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना कोरेगाव भिमा येथील दंगल प्रकरणात क्लीनचीट मिळाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांना कोरेगाव भिमा येथील दंगल प्रकरणात क्लीनचीट देण्यात आली आहे. त्यानंतर यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया देत मोठे विधान केलं आहे. ते म्हणाले की, संभाजी भिडे यांना क्लीनचीट मिळाली असं म्हणायचे कारण नाही. ज्यावेळी गुन्हा दाखल झाला त्यावेळी एफआयआरमध्ये नाव होतं. मात्र, आता पुरावे न मिळाल्याने त्यांचे नाव चार्जशीटमधून काढण्यात आले असावे. मात्र, तरीही आम्ही तपासून घेऊ, असे विधान वळसे पाटील यांनी केले आहे. ते मुंबईत माध्यामांशी बोलत होते. (Dilip Walse Patil On Sambhaji BHide)

भीमा कोरेगाव हिंसाचारात संभाजी भिडेंचा सहभाग नाही: पोलीस

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा सहभाग नसल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोगाव भीमा इथं झालेल्या हिंसाचारप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याविरोधात सन २०१८मध्ये गुन्हा दाखल झाला होता. पण तपासादरम्यान संभाजी भिडे यांचा कोरोगाव भीमा हिंसाचार प्रकरणात सहभाग आढळला नसल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे. तसेच ही माहिती राज्य मानवी हक्क आयोगालाही पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात अनिता सावळे यांनी तक्रार दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT