ITC Hotel google
मुंबई

आयटीसी हॉटेल, सीआयआय तर्फे हॉटेल डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू

तरुणांना कौशल्य व नोकऱ्या मिळणार

कृष्ण जोशी

मुंबई : भारतात १०० पंचतारांकित हॉटेल (Hundred five star hotels) मालकीची असलेला अग्रगण्य ग्रूप आयटीसी हॉटेल (ITC Hotel), सीआयआय उद्योग संघटना व आदरातिथ्य क्षेत्रातील स्वीत्झरलँडचे (Switzerland) अग्रगण्य विद्यापीठ ईएचएल (EHL) यांच्यातर्फे भारतातील तरुणांसाठी आदरातिथ्य क्षेत्रातील दीड वर्षांच्या डिप्लोमाची घोषणा आज येथे करण्यात आली.

आयटीसीचे वरिष्ठ अधिकारी निलेश मित्रा, अतुल भल्ला, सीआयआय चे सौगता रॉयचौधरी आणि ईएचएल चे प्रवीण रॉय व अमन सचदेव यांनी आज परळच्या आयटीसी ग्रँड सेंट्रल पंचतारांकित हॉटेलात पत्रकारांना ही माहिती दिली. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना आयटीसीच्या हॉटेलांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. हा अभ्यासक्रम ईएचएल मार्फत तज्ञांकडून शिकविला जाईल व त्यासाठीचे विद्यार्थी सीआयआय निवडेल. प्रशिक्षणानंतर त्यांना सीआयआय तर्फे नोकऱ्याही दिल्या जातील, त्यांना आयटीसी च्या हॉटेलांमध्ये किंवा अन्यत्र कोठेही नोकऱ्या मिळतील, असे निलेश मित्रा म्हणाले.

इंग्रजीतील चांगल्या गुणांसह बारावी उत्तीर्ण ही या अभ्यासक्रमाची पात्रता आहे, त्यांची मुलाखत घेऊन निवड केली जाईल. प्रथम मुंबई, दिल्ली, चेन्नई व कोलकाटा येथील आयटीसी च्या पाच हॉटेलांमध्ये २०० विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिले जाईल. तीन वर्षांत विविध तुकड्यांमधून किमान दहा हजार तरुणांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. याचे शुल्क सीआयआय कडे भरावयाचे असून ते अन्य व्यावसायिक महाविद्यालयांच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचेही भल्ला म्हणाले.

प्रवास-पर्यटन-आदरातिथ्य क्षेत्र

सन २०२८ ची परिस्थिती

जगात निर्माण होणाऱ्या नोकऱ्या - ४० कोटी

भारतातील कुशल तरुणांची गरज ५.३० कोटी

भारतातील सर्वात मोठे सेवाक्षेत्र होणार

जीडीपी मध्ये दहा टक्के वाटा राहणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT