student e sakal
मुंबई

बारावीनंतर इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला मिळणार थेट प्रवेश

संजीव भागवत

सीईटीची अटही रद्द; दहावी बारावीच्या गुणांवर होणार प्रवेश

मुंबई: बारावीत विशिष्ट असे विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला थेट प्रवेश मिळणार आहे. यासाठी आत्तापर्यंत आवश्यक असलेल्या पात्रतेत बदल करण्याचा महत्त्वाचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि आज जाहीर केला आहे. या निर्णयामुळे निश्चित केलेले कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे, तसेच या अभ्यासक्रमासाठी सीईटीही घेतली जाणार नाही अशी माहितीही त्यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. (Direct admission will be given to the second year of engineering degree after 12th standard without CET)

राज्यात यापूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या अनिवार्य विषयासह गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एक विषय घेऊन इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण असले पाहिजे अशी अट होती. ती आता बदलून शैक्षणिक वर्ष 2021-22 च्या इ. बारावीमध्ये भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, कॉम्पुटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक, इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी, जीवशास्त्र, इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलॉजी, टेक्निकल होकेशनल, अग्रिकल्चर, अभियांत्रिकी ग्राफिक्स,बिझनेस स्टडीज, एंटरप्रीनरशिप या विषयांपैकी कोणतेही तीन विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाले असल्यास अशा विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

पदविका शिक्षण संस्थांमध्ये काश्मिरी विस्थापितांबरोबरच, काश्मीरमधून विस्थापित न होता काश्मीर खोऱ्यांमध्ये राहत असलेल्या काश्मिरी पंडित / काश्मिरी हिंदू कुटुंबे (निवासी) आणि ज्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र आहे. अशा उमेदवारांना प्रवेशासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत.

रिक्त राहिलेल्या जागांवर आर्थिक मागासाना प्रवेश...

पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या रिक्त राहिलेल्या आर्थिक मागास प्रवर्गाच्या (ई डब्ल्यु एस) जागा थेट द्वितीय वर्षाच्या रिक्त जागांमध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहेत. अशा प्रथम वर्षाच्या रिक्त राहिलेल्या ई डब्ल्यु एस. प्रवर्गाच्या जागा ई डब्ल्यु एस प्रवर्गाच्या उमेदवारांना थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी उपलब्ध होणार असून थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेशासाठी जागा वाढणार आहेत.

पदविका अभ्यासक्रमासाठी सीईटी नाही..

प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेतली जाणार नाही.दहावी व बारावीच्या विद्यार्थांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. या मूल्यांकन व निकालाच्या आधारे मंडळामार्फत गुणपत्रक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे या गुणपत्रकाच्या आधारेच दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेताना दहावी व बारावीच्या गुणांचा विचार करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thar Accident सोमवारी पुण्याहून कोकणात जायला निघाले, गुरुवारी ताम्हिणी घाटातल्या दरीत थारसह ६ मृतदेह दिसले; कधी आणि काय घडलं?

भारतीय जवानाचं शिरच्छेद करून मुशर्रफसमोर ठेवलं, काय आहे किस्सा? ‘धुरंदर’मध्ये अर्जुन रामपाल साकारणार त्या राक्षसाचा चेहरा

Chief Minister Security : कोणत्या मुख्यमंत्र्यांना आहे जबरदस्त सुरक्षा कवच अन् जाणून घ्या, नितीश कुमारांची सुरक्षा कशी?

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात मोटार खोल दरीत कोसळली, चार मृतदेह हाती; मृतांची नावे समोर, सर्वजण पुण्यातील

Latest Marathi News Update LIVE : अमरावतीत काँग्रेसची आढावा बैठक; तीनही नगरपरिषद जिंकण्याचा कार्यकर्त्यांचा निश्चय

SCROLL FOR NEXT