मुंबई

जादा पैसे आकारणाऱ्या खासगी लॅबची मान्यता रद्द कराः महापौर

भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोना चाचणीसाठी जादा पैसे आकारले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. रुग्णांकडून कोरोना चाचणीसाठी जादा पैसे आकारले जात असल्यास खासगी लॅबची मान्यता रद्द करण्यात यावी, असे निर्देश महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी दिले आहेत. 

राज्य सरकारनं दिलेल्या दिशानिर्देशाप्रमाणे आणि निर्धारित केलेल्या दराप्रमाणे खासगी लॅब कोरोना चाचणीचे दर न आकारता अतिरिक्त शुल्क आकारत असल्याचे निर्दशनास आले असल्याचे महापौरांनी सांगितले.

यामुळे विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्यांची आज तातडीची बैठक बोलाविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त दर आकारणाऱ्या खासगी लॅबला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन संबंधित लॅबची तपासणी करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. या तपासणीत अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या लॅबला नोटीस बजावण्यात यावी तसेच समज देण्यात यावी, असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. नोटीस बजावल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करत असणाऱ्या खासगी लॅबची मान्यता रद्द करा, असे निर्देश महापौरांनी यावेळी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वेळोवेळी दिलेल्या दिशानिर्देशाप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी/ कर्मचारी यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नातून आपण कोरोनावर नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळे आपण सर्वांनी यापुढे दक्ष राहून या अवाजवी दरावर नियंत्रण मिळविण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.

दरम्यान, महानगरपालिकेनं निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारणाऱ्या खासगी लॅबवर अंकुश ठेवण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेच्या संबंधित विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची सोमवारी भायखळा, येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन कक्षात आढावा बैठक घेतली. याप्रसंगी कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, उप आरोग्य अधिकारी टिपरे, विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

------------------

(संपादन- पूजा विचारे)

Dismiss private labs that charge extra Mayor kishori pednekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20I Squad for England Tour: अक्षर पटेलची उपकर्णधारपदावरून हाकालपट्टी, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूकडे सोपवली जबबादारी

Illegal Liquor: पुण्यातील घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा सर्जिकल स्ट्राइक, ३ हजारपेक्षा जास्त गुन्हे दाखल

Asian Games 2026 : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा, सलग दुसरं गोल्ड मेडल मिळवण्याच्या हेतूने उतरणार मैदानात

देशात खळबळ! मोठा पक्ष फुटणार? १६ खासदारांचे फोन बंद, २२ खासदार पक्ष फोडण्यास तयार; मुख्यमंत्री दिल्लीत तळ ठोकून

India T20I Squad for England Tour: सूर्याला डच्चू! अडीच वर्षांपासून बाहेर असलेला खेळाडू झाला कर्णधार; वैभव सूर्यवंशीचीही निवड

SCROLL FOR NEXT