वाहनांसाठी आकर्षक क्रमांक ...नको रे बाबा!  
मुंबई

वाहनांसाठी आकर्षक क्रमांक ...नको रे बाबा!

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या आकर्षक क्रमांकांची मागणी गेल्या वर्षभरात घटली आहे. त्यामुळे नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. 

शहरात एप्रिल २०१९ ते डिसेंबर २०१९ मध्ये ३०४४ फॅन्सी आकर्षक क्रमांकांची विक्री करण्यात आली. या माध्यमातून वाशी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरीत ३ कोटी ६३ लाख ३ हजार रुपये जमा झाले. याउलट एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०१८ मध्ये ४२४६ फॅन्सी क्रमांकांची विक्री करण्यात आली होती. त्याद्वारे आरटीओच्या तिजोरीत ३ कोटी १७ लाख ७२ हजार इतकी रक्कम जमा झाली. अर्थात एप्रिल २०१८ ते डिसेंबर २०१८ च्या तुलनेत एप्रिल २०१९ ते डिसेंबर २०१९ मध्ये १२०२ इतक्‍या आकर्षक क्रमांकांच्या विक्रीत घट झाली असून, प्रादेशिक कार्यालयाच्या उत्पन्नातदेखील घट झाली आहे. 

आकर्षक क्रमांकासाठी सरकारकडून जादा शुल्क आकारणी केली जाते. नवी मुंबईत आकर्षक क्रमांक घेण्याकडे वाहनचालकांचा कल कमी होत असल्याचे परिवहन विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आकर्षक क्रमांक घेताना अंकांची बेरीज करून शेवटच्या अंकाची संख्या भाग्य क्रमांक असतो, तोच यायला पाहिजे, असा आकर्षक क्रमांक घेणाऱ्यांचा कल असतो. त्याचप्रमाणे आधीचे वाहन भाग्यशाली लागल्यास त्याच वाहनांचा नंबर पुन्हा घेण्यासाठी देखील आरटीओकडे मागणी करण्यात येते, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी सांगितले. 

एप्रिल ते डिसेंबर या काळात वाहनांची नवीन शृंखला सुरू झाली नाही. त्यामुळे आकर्षक क्रमांकांच्या मागणीत घट झाल्याची शक्‍यता आहे. 
- दशरथ वाघुले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशी. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT