varsha gaikwad Sakal
मुंबई

Congress Party : काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी उघड; मुंबई अध्यक्षांची बैठकीला दांडी

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीच बैठकीला दांडी मारल्यामुळे बैठक रद्द करण्यात आली.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - महाविकास आघाडीतील जागावाटपाची घोषणा झाल्यानंतर सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई या जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी उघड होत आहे. मुंबई काँग्रेसच्या आज आयोजिण्यात आलेल्या बैठकीत याचे प्रत्यंतर आले. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीच बैठकीला दांडी मारल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली.

मुंबईत सन्मानजनक जागावाटप होणे गरजेचे होते; परंतु उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने मुंबईतील चार जागांवर परस्पर उमेदवार जाहीर केले, अशी काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांची नाराजी आहे. त्यातही, ज्या दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर एकेकाळी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड विजयी झाले होते, त्या जागेवर अनिल देसाई यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले.

ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह वर्षा गायकवाडांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरला आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी नाराजी थेट दिल्लीला फोन करून कळवली असल्याचे समजते. दरम्यान, मुंबई काँग्रेसची आज होणारी बैठक ही एक दिवसासाठी पुढे ढकलली आहे. असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बैठक उद्या (ता. ११) होणार आहे.

काँग्रेसची अवहेलना झाल्याचा सूर

मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी केवळ दोनच जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. त्यातही दक्षिण मध्य मुंबईची जागा ठाकरे यांच्या पक्षाच्या वाट्याला गेली आहे. ‘मविआ’तील जागावाटपानंतर ही नाराजी उफाळून आली. ‘मविआ’त काँग्रेसची अवहेलना केली जात असल्याचा सूर कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे, सांगलीची जागा न मिळाल्याने नाराज झालेल्या विश्‍वजित कदम आणि विशाल पाटील यांनीही आज पत्रकार परिषद घेत या जागावाटपाचा फेरविचार करण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT