वसई-विरार महापालिकेतर्फे सुरू असलेले खड्डे बुजवण्याचे काम.  
मुंबई

वसई-विरार पालिका दूर करणार खड्ड्यांचे विघ्न

सकाळ वृत्तसेवा

वसई ः गणेशोत्सव तोंडावर आला असून घरोघरी आणि सार्वजनिक मंडळात गणरायाचे लवकरच आगमन होणार आहे. वसई-विरार शहरात गणेश आगमनात खड्ड्यांचे विघ्न असल्याने भक्तांना अडसर निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनातर्फे खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे. 

वसई-विरारमधील रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, नागरिक, रुग्ण, अत्यावश्‍यक सेवा आदींना फटका बसत आहे. हाडे खिळखिळी होत असून मणका, कंबर आदी आजार डोके वर काढत आहेत. वालीव, संतोष भुवन, सोपारा, गास, नवघर, माणिकपूर, शंभर फूट मार्ग, सातिवली, विरार, गावराईपाडा, पेल्हार, धानीवबाग, नागिनदास पाडा, आचोळे, तुळिंज यासह मुख्य रस्ते खड्डेमय झाल्याने रस्ते ओळखणेही कठीण झाले आहे.

नागरिक रस्ता दुरवस्थेमुळे बेजार झाले आहेत. त्यातच गणेशभक्त गणरायांची मिरवणूक घेऊन जाताना त्यांना खड्ड्यांमुळे कसरत करावी लागण्याची भीती आहे. त्यामुळे वसई-विरार महापालिकेच्या बांधकाम विभागाने खड्ड्यांची तपासणी करून नालासोपारा, विरार, आचोळे, चंदनसार, वालीव, पेल्हार, नवघर-माणिकपूर, वसई गाव, बोळिंज, नालासोपारा प्रभागीय कार्यालयातील सहायक आयुक्तांकडून रस्त्यावर पडलेल्या खड्यांची माहिती मागवून त्यानुसार खड्डे बुजविण्याची लगबग सुरू केली आहे. मुख्य आणि अंतर्गत रस्ते दुरुस्त केले जात आहेत. यामुळे वाहनचालकांसह नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे. 

वसई-विरार शहरात पावसामुळे रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले होते. त्या ठिकाणची पाहणी करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त केले जात आहेत. नागरिकांना गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेऊन ज्या ठिकाणी अद्याप खड्डे असतील तेही बुजवण्यात येतील. 
राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता, सावर्जनिक बांधकाम विभाग, पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT