crime  esakal
मुंबई

Palghar Crime news: म्हैस चरण्यावरुन झाला वाद अन् डोक्यात घातला दगड.. शेतकऱ्यांच्या भांडणात एकाचा मृत्यू

CD

पालघर, ता.२३ (बातमीदार) : सफाळे येथील खार्डी दोन शेतकऱ्यांमध्ये म्हैस चरण्याच्या वादातुन एकाच्या हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी वसंत सखाराम भोईर याने प्रकाश यशवंत घरत याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. केळवे सागरी पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या खार्डी गावातील दूध व्यवसाय करणाऱ्या वरील दोन शेतकऱ्यांमध्ये म्हैस चारण्यावरून वाद होता.

रविवारी (ता.२३) संध्याकाळी या दोघांमधील वादाचे रुपातंर मोठ्या भांडणात झाले. सोमवारी हे दोघे आपल्या म्हशी चरायला गावाच्या बाहेर लांबवर घेऊन गेले असताना दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर दोघांमध्ये हाणामारीत होत आरोपी वसंत भोईर याने खाडी किनाऱ्यावर असलेला दगड उचलून जमिनीवर पडलेल्या प्रकाश घरत याच्या डोक्यात घातला. यामध्ये प्रकाश घरत यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence News : कोल्हापुरात फलक व झेंड्यावरून दोन गटांत तुफान राडा, हत्यारे, दगडफेकीसह वाहनांची जाळपोळ

रोहित शर्मा, विराट कोहली यांचे पुढे काय? BCCI म्हणते, आमचे धोरण स्पष्ट आहे, त्यांचा निर्णय...

Latest Marathi News Updates : नागपूरसाठी ऐतिहासिक परंपरा लाभलेली काळी पिवळी मारबत मिरवणूक आज निघणार

कारने LPG टँकरला धडक देताच उडाला आगीचा भडका, ५० पेक्षा जास्त जण होरपळले

Supreme Court: सर्व निकाल रद्द! निवृत्त न्यायमूर्तींच्या निर्णयांवर सर्वोच्च कोर्टाचा मोठा आदेश, सरन्यायाधीश गवई काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT