मुंबई

धारावी पुर्नविकास प्रकल्पाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात

- सुनीता महामुणकर

मुंबईः अद्यापी सुरु न झालेल्या धारावी पुर्नविकास प्रकल्पाचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्य सरकारकडून मंजूर झालेली तब्बल 7200 कोटी रुपयांची निविदा रद्द का केली याचा खुलासा दोन आठवड्यात करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला केले आहेत.

रिपब्लिक ऑफ सेशेल्समधील अग्रणी कंपनी सेकलिंक टेक्‍नोलॉजिस कॉर्पोरेशनने न्यायालयात याचिका केली आहे. सन 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दुबईमध्य भेटून या प्रकल्पाची चर्चा केली होती. मार्च-एप्रिल 2019 मध्ये मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने रेल्वे जमिनीचा मुद्दा उपस्थित करत निविदा प्रक्रिया रद्द केली आहे. आता ऑक्‍टोबरमध्ये पुन्हा या प्रकल्पाची चर्चा सुरू झाली असून नव्याने निविदा मागविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. हा संपूर्ण प्रकार मनमानी करणारा आणि बेकायदेशीर आहे, असा दावा करणारी याचिका एड बिरेन्द्र सराफ यांच्या मार्फत कंपनीने केली आहे. याचिकेवर न्या. नितीन जामदार आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी झाली. मात्र राज्य सरकारच्या वतीने या युक्तिावादाचे खंडन करण्यात आले. 

निविदा प्रक्रिया अंतिम झालेली नव्हती, त्यामुळे कंपनीची निविदा मंजूर झाली असे म्हणता येणार नाही. रेल्वे विभागाने लावलेल्या अतिरिक्त शर्तींमुळे ती थांबविली होती. आता पुन्हा नव्याने निविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सरकारच्या वतीने ज्येष्छठ विधीज्ज्ञ मिलिंद साठे यांनी खंडपीठाला सांगितले.
मागील निविदेमध्ये कंत्राट जिंकले असूनही याबाबत सरकारकडून अधिकृतपणे पत्र देण्यास विलंब करण्यात येत आहे आणि 11  नोव्हेंबरला कंत्राट रद्द केल्याची माहिती दिली, असे याचिकेत म्हटले आहे.

तब्बल नऊ लाख लोकवस्ती असलेल्या धारावीचा परिसर 240 हेक्‍टरमध्ये विस्तारलेला आहे. मागील दहा वर्षाहून अधिक काळ या प्रकल्पावर अभ्यास सुरू आहे. देशातील आणि विदेशातील कंपन्यांनी या निविदा प्रक्रियेत रस दाखविलेला आहे.
-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Dispute over Dharavi redevelopment project now in Bombay High Court

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT