मुंबई

'एमएमआर' क्षेत्रातील वीज पुरवठा खंडित रेल्वे सेवा विस्कळीत; विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा खोळंबा

तेजस वाघमारे


मुंबई : वीज पुरवठा करणाऱ्या ग्रीड मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेलाही याचा फटका बसला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास एक तास लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 ग्रीड मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुंबई महानगर क्षेत्रात वीज खंडित झाली. यामुळे सर्व कामे ठप्प झाली. तर याच परिसरातील काही ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत आहे. पश्चिम, मध्य रेल्वे सेवा ही विस्कळीत झाली आहे. यामुळे लोक रेल्वे गाड्यांमधून उतरून रुळावरून चालत आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षानाही याचा फटका बसला आहे. वीज पुरवठा पूर्ववत होण्यास एक तास लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. टाटा पावरकडून येणारा विद्यूत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्यूत पुरवठा खंडित झाला आहे. ग्राहकांच्या गैसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे बेस्टने कळविले आहे.

तर महापारेषणच्या 400 केवी कळवा पडघा जीआयएस केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने हा बिघाड झाल्याचे बोलले जात आहे.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

Chhatrapati Sambhajinagar News : वर्षानुवर्षे ठाण मांडलेल्या मराठवाड्यातील 22 अधिकाऱ्यांची एकाच दिवशी उचलबांगडी; मक्तेदारी अखेर मोडीत

Khadakwasala Dam Water : पाण्याने गाठला १० वर्षातील तळ! पवना, वरसगाव, पानशेत धरणांचा दिलासा पण खडकवासल्याचं काय?

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

उकळलेला चहा प्यायल्यानंतर १२वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, वडिलांचे शाळा व्यवस्थापनावर आरोप; तज्ज्ञांनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT