मुंबई

पाण्याचे वितरण सुलभ

सकाळवृत्तसेवा

मुंबई - पाण्याच्या वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर केल्या जाणार आहेत. त्यासाठी पाण्याच्या वितरण व्यवस्थेचा आराखडा, जलमापकांचा पुरवठा आणि स्काडा प्रणालीमध्ये सुधारणा करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. पालिका त्यासाठी तब्बल ११२ कोटी रुपये खर्च करणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला लवकरच स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळणार आहे. 

मुंबई शहर आणि उपनगराला तुळशी, विहार, तानसा, उच्च वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर आणि भातसा अशा सात तलावांमधून पाणीपुरवठा होतो. सात तलावांमधून येणाऱ्या जलवाहिन्यांतून घराघरात पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, पाण्याच्या वितरण व्यवस्थेत त्रुटी असल्याने कमी-अधिक प्रमाणात पाणीपुरवठा होत असतो. त्यामुळे डोंगराळ भागाबरोबरच पाणीपुरवठ्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या वसाहतींना पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होत आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. पाण्याच्या वितरण व्यवस्थेतील दोष दूर करण्यासाठी जलवितरणात सुधारणा करण्याचा कार्यक्रम पालिकेने हाती घेतला आहे. कार्यक्रमाच्या अंतर्गत नेमलेल्या सल्लागार मे. सुवेज एन्व्हायर्न्मेंट इंडिया प्रा. लि. यांच्याकडून पाहणी करण्यात आली. त्यांच्या पाहणीत, प्रवाहमापन प्रणालीमध्ये त्रुटी असून सदर प्रणालीचा फेरआढावा घेण्यात आला. तलाव ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या जलवाहिन्या आणि दुसऱ्या टप्प्यातील महासंतुलन जलाशय आणि सेवा जलाशयात काही बदल सुचविण्यात आले आहेत. मुंबई जलवितरण सुधारणा कार्यक्रमांतर्गत सल्लागारांनी दिलेल्या स्काडा निदान सूचक अहवालात, कार्यरत असलेल्या सर्व स्काडा प्रणालीचे एकाच प्रणालीत संकलन केले जावे, असेही सुचवण्यात आले आहे. हे काम कंत्राटदार विश्‍वराज एन्व्हायर्न्मेंट प्रा. लि. आणि मेकॅट्रॉनिक्‍स सिस्टिम्स प्रा. लि. यांना दिले जाणार आहे. प्रस्तावाला स्थायी समितीची येत्या बैठकीत मंजुरी मिळणार आहे.

६२ प्रवाहमापके बसविण्याची योजना 
सल्लागारांच्या अहवालानुसार, पहिल्या आणि दुय्यम दर्जाचे नेटवर्क आणि जलवितरण प्रणालीमधील त्रुटी दूर करण्याकरिता एकूण ६२ प्रवाहमापके बसविण्याची विस्तारित स्वरूपाची योजना तयार करण्यात आली आहे. विद्यमान पाणीपुरवठा व्यवस्थेत जलस्रोत ते विविध पाणीपुरवठा विभागामध्ये पर्यवेक्षण आणि नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या पाच स्काडा प्रणाली कार्यान्वित आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT