मुंबई

माळशेज घाटातील स्कायवाॅक व झीप लाइनच्या ठिकाणांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी

नंदकिशोर मलबारी

सरळगांव: कल्याण- नगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात होणा-या काचेचा स्कायवाॅक व झीप लाइन ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणांची पहाणी करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व आमदार किसन कथोरे यांनी भेट दिली. या वेळी माळशेज घाटातील धोकादायक ठिकाणांची पहाणी त्यांनी केली.

माळशेज घाटातील एम. टी. डी. सी. ते व्ही. पाॅईट पर्यंत ही झीप लाईन होणार आहे. चीन येथे 10 मिटरचा काचेचा स्काय वाॅक आहे. माळशेज घाटात होणारा स्कायवाॅक ही पूर्णपणे काचेचा असून त्याची लांबी 25 मी. असल्याने माळशेज घाटातील स्काय वाॅक हा जगातील सर्वात लांबीचा स्कायवाॅक ठरणार आहे. हा  स्कायवाॅक केंद्र शासन पर्यटन विभागाकडून मिळणाऱ्रया निधीतून केला जाणार आहे. याच स्कायवाॅकच्या लगत पर्यटकांना थरारक अनूभव घेण्यासाठी झीप लाईन केली जाणार आहे.

झीपलाइनसाठी वन विभागामार्फत 2 कोटी 50 लाख रूपये निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाला सुरवात केली जाणार आहे. या नंतर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आमदार किसन कथोरे यांच्या समवेत माळशेज घाटातील धोकादायक ठिकाणांची पहाणी करून भविष्यात अपघात होऊ नये यासाठी काय उपाययोजना केली जाणार आहे याची माहीती राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांच्याकडून घेतली. यात घाटातील शूशोभिकरण व धोकादायक ठिकाणांची दुरूस्ती करण्या साठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्या कामांची लवकरच सुरवात होणार असल्याची माहीती दिली.

या ठिकाणी होणाऱ्या 25 मीटर लांबीच्या काचेच्या स्कायवाॅक साठी लागणारी मंजुरी अंतिम टप्यात असून सर्व खात्याची परवानगी मिळाल्यानंतर या कामालाही सुरवात होणार असल्याची माहीती यावेळी आमदार कथोरे यांनी दिली. या वेळी  वनविभागाचे विभागीय वन अधिकारी रामगावकर, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन, तहसीलदार सचिन चौधर,नायब तहसीलदार हनुमंत जगताप, वन अधिकारी हिरवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?

ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

SCROLL FOR NEXT