Diva Bodybuilding Competition Swapnil Santosh Ghatkar win title of Diva Best Mr 2024 health fitness
Diva Bodybuilding Competition Swapnil Santosh Ghatkar win title of Diva Best Mr 2024 health fitness Sakal
मुंबई

Diva Bodybuilding Competition : दिव्यातील गो जिमच्या स्वप्निल संतोष घाटकरने ‘दिवा सर्वश्रेष्ठ श्री 2024’ किताबाचा मिळवला मान

सकाळ वृत्तसेवा

दिवा : दिवा शहर अंतर्गत जिम मालक संघटनेच्या विद्यमाने व ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना (हाईट ग्रुप) यांच्या मान्यतेने पहिली दिवा अंतर्गत शरीरसौष्ठव स्पर्धा काल संपन्न झाली. ही शरीरसौष्ठव स्पर्धा पॉवर झोन फिटनेस, दिवा पूर्वचे संचालक तेजस शंकर भोईर, भूषण जनक म्हात्रे, राजेंद्र सुरेश ठाकूर यांनी आयोजित केली होती.

या स्पर्धेत 70 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. तर स्पर्धेत दिव्यातील गो जिमच्या स्वप्निल संतोष घाटकरने ‘दिवा सर्वश्रेष्ठ श्री 2024’ किताबाचा मान मिळवला. यात दिव्यातील युनिक फिटनेस, फिट ऍण्ड फाईन फिटनेस जिम, श्रीमंतयोगी जिम,

गो जिम, सॅम फिटनेस जिम, श्री भोईर ब्रदर्स जिम, बिईंग स्ट्राँग फिटनेस, फेटल जिम, मसल मंच जिम, सिद्धेश्वर जिम, केव्हीस जिम अशा एकरा जिम मधील 70 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. मसल मंच जिमने 27 अधिक गुणांसह सांघिक जेतेपद पटकावले. सॅम फिटनेस जिम 27 वजा गुणांसह दुसऱ्या स्थानी राहिला.

स्पर्धेतील सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शक म्हणून मसल मंच जिमच्या शिवा अनिल घोगळेची निवड करण्यात आली. तर सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शक उपविजेता सॅम फिटनेस जिमचा महेंद्र पावसकर ठरला. तसेच पॉवर झोन फिटनेस जिमच्या स्वप्नील बाळकृष्ण काटकर सर्वोत्तम पिळदार शरीरयष्टीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तर सर्वोत्तम पिळदार शरीरयष्टीचा पुरस्कार उपविजेता श्रीमंतयोगी जिमच्या सिध्दांत दळवी झाला. या शरीरसौष्ठव स्पर्धेतील उगवता तारा म्हणून मसल मंच जिमच्या निलेश केवटला पुरस्कार देण्यात आला.

या शरीरसौष्ठव स्पर्धेत राष्ट्रीय पंच विनायक केतकर (सचिव) ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना, संतोष मलबारी - (उपाध्यक्ष) ठाणे जिल्हा हौ. श. सौं. संघटना व सह सचिव महाराष्ट्र राज्य संघटना, राष्ट्रीय पंच व राष्ट्रीय निवेदक तर अशोक मोकाशी राष्ट्रीय पंच (जेष्ठ) लाभले होते.

यावेळी माजी उपमहापौर रमाकांत मढवी, माजी नगरसेवक शैलेश पाटील, अमर पाटील, दिपक जाधव, साबे विभाग प्रमुख निलेश पाटील, दिवा पश्चिम विभाग प्रमुख भालचंद्र भगत, धर्मविर नगर विभाग प्रमुख सचिन चौबे, शंकर भोईर,

भूषण म्हात्रे, राजेंद्र ठाकूर, तेजस भोईर, जनक म्हात्रे इ. मान्यवर आणि दिव्यातील विविध जिम मधील बॉडी बिल्डर उपस्थित होते. तेथे जमलेल्या प्रेक्षकांनी स्पर्धकांना चांगले प्रोत्साहन दिल्याने सर्वांची मने जिंकली. ही स्पर्धा अतीतटीची झाल्याने छान रंगली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT