मुंबई

दिवा शहराचा स्वच्छ शहर होण्याकडे प्रवास

संजीत वायंगणकर

डोंबिवली - शहराची व्याप्ती व लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना दिव्यात कचऱ्याची समस्याही उग्र रुप धारण करत आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्याकडून महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. या पाठपुराव्याला यश आले असून, दिवा शहरातील कचरा उचलण्यासाठी नवीन 12 वाहने, 1 कॉम्पोक्टर व 60 सफाई कामगार ठाणे महापालिकेने नव्याने उपलब्ध करुन दिले असून शहरातील कचरा समस्या काही प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे. यात नागरिकांचे योग्य सहकार्य मिळाले तर नक्की दिवा शहर स्वच्छ होईल असा विश्वास उपमहापौर रमाकांत मढवी यांनी व्यक्त केला.

दिवा शहरात नियमित कचरा उचलण्यासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग कमी असल्याने दैनंदिन कचरा उचलण्यास अनेक अडचणी येत होत्या. याबाबत दिव्यातील नागरिकांनीही वारंवार स्थानिक नगरसेवकांकडे याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. 

दिवा वासीयांची या समस्येतून सुटका व्हावी यासाठी महापालिकेने 12 नवीन वाहने 1 कॅम्पोक्टर व 60 कर्मचारी उपलब्ध झाले आहेत. तसेच आणखी 2 डंम्पर प्लेसर व 1 डंम्परही काही दिवसात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे आता दिवावासीयांची कचरा दुर्गंधीपासून सुटका होणार आहे. यात नागरिकांनी सुद्धा सहकार्य अपेक्षित आहे.ठाणे शहर हे स्मार्टसिटीकडे वाटचाल करीत असताना आता दिवा शहरही स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे ठाणे महानगरपालिका दिवा प्रभाग समिती अंतर्गत देसाई, खिडकाळी, पडले विभागासाठी देसाई जकात नाका येथे स्वच्छता विभागचे नविन स्वतंत्र हजेरी शेड सीरु झाले आहे. नवीन घंटा गाड्या आणि नविन सफाई कर्मचारी ठाणे महानगरपालिकेने दिले आहेत.
मात्र दिवा शहर कचरा मुक्त शहर करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना सुद्धा दिवा येथील वादग्रस्त डम्पिंग अद्याप हटवले गेले नाही आहे. सत्ताधारी शिवसेना आणि मुख्यमंत्री यांना निवडणुकीत दिलेले आश्वासन विसरले की काय असा प्रश्न नागरिक विचारू लागेल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT