rail work
rail work 
मुंबई

लॉकडाऊनचा असाही फायदा; दिवा लेव्हल क्रॉसिंगचे काम दोन आठवड्यात पूर्ण

वृत्तसंस्था

मुंबई : रेल्वेमार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येतो. मात्र, सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे रेल्वे देखभाल-दुरुस्तीचे अनेक कामे पूर्ण करण्यात येत आहे. मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दींपैकी असलेल्या दिवा लेव्हल क्रॉसिंगच्या मेटनेन्सचे काम पंधरा दिवसात पूर्ण झाले आहे. मे च्या उत्तरार्धात हे अत्यंत महत्त्वाचे काम करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संगितले. 

दिवा लेव्हल क्रॉसिंगच्या मेटेनन्सचे काम आव्हानात्मक आहे. काँक्रीटचा रस्ताही त्या दरम्यान असल्यामुळे हे काम अवघड असते. हे काम वर्षातून एकदा होते. या ठिकाणी आठ लाईन्स असल्यामुळे काम खूपच महत्त्वाचे असते. तसेच त्या लाईनवर मेगाब्लॉक घेत चार ते पाच महिने हे काम सुरु राहते. मात्र, लॉकडाऊनमुळे सध्या रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणावर कमी झाली होती. त्यामुळे या कामात फारसा अडथळा आला नाही आणि ते सलगपणे झाले. 

लॉकडाऊन नसताना आठपैकी दोन लाईनवर एकावेळी काम होते आणि ते टप्प्याटप्प्याने करण्यात येते. मात्र, यावेळी ते सलगपणे झाले आणि ते अवघ्या पंधरा दिवसात झाले, असे सांगण्यात आले. याच कालावधीत आसनगाव स्थानकादरम्यानचे कामही पूर्ण झाले. मेटेनन्सच्या कामात या रेल्वे मार्गाला क्रॉस होत असलेल्या कॉक्रिंटच्या रस्त्याच्या कामाचाही समावेश असतो. त्याचबरोबर स्लीपर्स बदलणे तसेच आवश्यकतेनुसार फिटिंग आणि ट्रॅकही बदलण्यात येत असतात. या कामामुळे ट्रेन नियमीतपणे धावण्यास मदत होते. हे सर्व काम रेल्वेच्या ट्रॅकमननी केले; त्यावेळी सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन करण्यात आले असेही सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT