best bus sakal media
मुंबई

BMC आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर

मुंबई महापालिकेच्या १ लाखांहून अधिक कर्मचारी आणि बेस्टच्या ३४ हजार कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे.

सुमीत सावंत, मुंबई

मुंबई: दिवाळीमध्ये (Diwali) सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिक्षा असते ती बोनसची. (Bonus) यंदाच्या दिवाळीत किती बोनस मिळणार, याची कर्मचाऱ्यांना उत्सुक्ता असते. बोनसच्या आकड्यावर दिवाळीत खरेदीचे प्लान्स बनवले जातात. दरवर्षी मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना किती बोनस मिळणार याची चर्चा होते.

यंदाची मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. मुंबई महापालिका आणि बेस्टच्या कर्मचा-यांना प्रत्येकी २० हजार रूपये दिवाळी बोनस जाहीर केला आहे. कोरोना काळात काम केल्याचे कर्मचा-यांना दिवाळी गिफ्ट आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे.

पुढील तीन वर्षे २० हजार रूपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई महापालिकेच्या १ लाखांहून अधिक कर्मचारी आणि बेस्टच्या ३४ हजार कर्मचा-यांची दिवाळी गोड होणार आहे. मागच्यावर्षी आणि यंदा सुद्धा कोरोना काळात बेस्ट आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जबाबदारी पार पडली होती. महापालिका आणि बेस्टचे कर्मचारी दोन्ही अत्यावश्यक सेवांमध्ये मोडतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

Maharashtra Live News : सांगोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; 84 लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

कॅन्सरशी लढताना मनीषा कोईराला ठरली आधार! सोनाली बेंद्रेने केला मोठा खुलासा, म्हणाली...

Farmers Success: थेंबाथेंबातून फुलविली द्राक्षबाग;अंबेजवळगे येथील सुनीता बिरंजे यांचा जलव्यवस्थापनाचा आदर्श

SCROLL FOR NEXT