mumbai firecrakers sakal
मुंबई

Diwali: वेळेचे उल्लंघन करत फटाके फोडल्याने मुंबई पोलिसांनी 1000हून अधिक नागरिकांवर दाखल केले गुन्हे

Chinmay Jagtap

Mumbai News: हवा प्रदूषण नियंत्रणासाठी फटाके वाजविण्यावर उच्च न्यायालयाने घातलेल्या वेळमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. मुंबई शहरात पाच दिवसांत सुमारे 1134 नागरिकांवर बेकायदेशीरपणे फटाके फोडल्या प्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मागील 2 दिवसात 350 गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

1000 हून अधिक गुन्हे

गेल्या पाच दिवसांत नियम उल्लंघनप्रकरणी मुंबईत 1134 गुन्हे नोंदविण्यात आले. त्यातील बहुसंख्य गुन्हे फटाक्यांसाठीच्या वेळमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांनी 10, 12 आणि 12 नोव्हेंबर या तीन दिवसांत 784 गुन्हे दाखल केले. याप्रकरणी 806 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यातील 734 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर 2 दिवसांत आणखी 350 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात फटाके विक्रेत्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

न्यायालयाचे निर्देश

गेल्या काही दिवसांपासून मुंबई महानगर प्रदेशात हवेचा दर्जा घसरला असून, दिवाळीत फटाक्यांच्या आतषबाजीने प्रदूषणअधिक झाले आहे. 10 नोव्हेंबर रोजी, वायू प्रदूषणासंदर्भातील सू-मोटो याचिकेच्या सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या .

सरन्यायाधीश डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने फटाके फोडण्याच्या वेळेत बदल करून रात्री 8 ते रात्री 10 या वेळेत परवानगी दिली होती. यापूर्वी हायकोर्टाने संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत फटाके फोडण्याची परवानगी दिली होती. याशिवाय बेरियम रसायन असलेल्या फटाक्यांवर बंदी घालण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यात; पाहा थेट प्रक्षेपण

Video: अक्षय कुमार आणि अमृता फडणवीस गणेशोत्सवानंतर स्वच्छता मोहिमेत सहभागी, समुद्रकिनाऱ्याची केली साफसफाई

लालबागच्या राजाचं विसर्जन कसं करायचं? गुजरातहून खास अत्याधुनिक तराफा आणला, पण मूर्ती चढवण्यात अडचणी

US Open जिंकल्यानंतर सबलेंका पत्रकार परिषदेत थेट शॅम्पेनची बॉटलच घेऊन आली, काय म्हणाली पाहा Video

Sindhudurg Railway : सिंधुदुर्गात रेल्वे स्थानके तुडुंब, परतीचा प्रवास; वाहतूकीचे वेळापत्रक कोलमडले, चाकरमान्यांचे हाल

SCROLL FOR NEXT