do not allow food sellers in local train demand of MNS mla raju patil Sakal
मुंबई

Mumbai Local Train : लोकलमध्ये फेरीवाल्यांना परवानगी नको; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडे पत्राद्वारे मागणी

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली- मुंबई शहर आणि उपनगरीय रेल्वेत फेरीवाल्यांना प्रशासनाकडून परवानगी देण्याचा विचार करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात रेल्वेने प्रवास करत असताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातच फेरीवाल्यांना परवानगी दिल्यास प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

त्यामुळे लोकलमध्ये फेरीवाल्यांना परवानगी देऊ नये यासाठी मनसे आमदार राजू पाटील हरकत घेतली आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वेत प्रवासादरम्यान प्रवेश करण्यापासून उतरण्यापर्यत मोठा संघर्ष करावा लागत आहे.

त्यातच अनधिकृत फेरीवाल्यांना प्रवेश दिल्यास प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. सद्य परिस्थितीत अनधिकृत फेरीवाल्यांच्या तक्रारी रेल्वेकडे प्रवाश्यांनी केलेल्या लक्षणीय आहेत.

मात्र प्रवाशांच्या तक्रारींकडे रेल्वेने दुर्लक्ष केलेलं दिसून आलं आहे.त्यामुळे रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असताना आता फेरीवाल्यांचा मोठा मनस्ताप निर्माण होणार आहे.त्यामुळे रेल्वेने अनधिकृत फेरीवाल्यांना लोकलमध्ये माल विकण्यास दिलेल्या परवानगीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे केली आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता लोकल वाढवण्याचे आश्वासन दिले होते.मात्र या आश्वासनाची पूर्तता होण्याआधीच रेल्वेत अनधिकृत फेरीवाल्यांना प्रवेश देऊन रेल्वे प्रवाश्यांना मनस्ताप देण्याच्या विचारात आहे.त्यामुळे रेल्वेने घेतलेल्या निर्णयाला तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT