file photo 
मुंबई

पावसात रेल्वेमार्गातून चालताना छत्री उघडू नका!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पावसापासून बचाव करण्यासाठी अनेक जण छत्रीचा वापर करतात. मात्र, अशी छत्री घेऊन तुम्ही रेल्वेच्या अतिउच्च दाबाच्या वीजवाहक तारांखालून जात असाल तर तुम्हाला हलका विजेचा धक्का बसू शकतो. काही दिवसांपूर्वी रेल्वे कोलमडल्याने रुळांतूनच मार्गक्रमण कराव्या लागलेल्या प्रवाशांना तसा अनुभव आला आहे. त्यामुळे अशा तारांखाली छत्री उघडून जाऊ नये. इतर वेळीही कधी रेल्वेच्या अतिउच्च दाबाच्या वीजवाहक तारांखालून जाऊ नका, असा सल्ला जाणकार देत आहेत.

बुधवारी (ता. ४) तुफानी पावसामुळे शहरातील लोकल बंद पडल्याने शेकडो नागरिक रेल्वेमार्गातून चालत पुढच्या स्थानकात गेले होते. त्यावेळी वीजवाहक तारेखालून चालत असलेल्या अनेकांना असा हलका विजेचा धक्का बसला होता. मात्र, मोबाईल कॉल आल्यावर असा धक्का बसला की सिग्नलजवळ ते मात्र प्रवाशांना नेमके कळले नव्हते. छत्रीतील धातूच्या भागाला हात लागला की धक्का बसत असल्याचा अनुभव अनेकांना आला. शहरातून मानखुर्द, धारावी, शीव आदी अनेक ठिकाणी उच्च दाबाच्या वीजवाहक तारांचे टॉवर आहेत. पावसात त्या तारांखालून उघडी छत्री घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना विजेचा हलका धक्का बसल्याचा अनुभव अनेकांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केला. 

विजेच्या तारांमधून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे असा धक्का लागल्याचे प्रवासी सांगतात. शीव-पनवेल महामार्गाला समांतर उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या आहेत. आंबेडकर नगर, ज्योतिर्लिंग नगर, मंडाळा झोपडपट्टी परिसराच्या वरून आणि पीएमजीपी व म्हाडा वसाहतींमधून उच्च दाबाच्या विद्युतवाहिनी जातात. त्यामुळे लोखंड व इतर विद्युतवाहक धातूंच्या वस्तू किंवा छत्री हातात असेल तर विजेचा धक्का लागतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

का लागतो धक्का?
उच्च दाबाच्या वहिनीभोवतालचा वर्तुळाकार भाग विद्युत प्रभावाखाली असतो. त्या वाहिनींखालील जमीन अर्थिंग झोन म्हणून ओळखली जाते. अशा जमिनीवरून कोणी उघडी छत्री किंवा विद्युतवाहक धातूची वस्तू घेऊन गेल्यास ती नेणाऱ्या व्यक्तीला धक्का बसतो, असे जाणकारांनी सांगितले. म्हणूनच वीजनिर्मिती प्रकल्पात किंवा सबस्टेशनमध्ये कर्मचारी केव्हाही छत्री नेत नाहीत, तर रेनकोटच घालतात, असे काही अभियंत्यांनी सांगितले. अशा वीजवाहिन्यांखाली घरे वा झोपड्याही असू नयेत. 
     

  • रेल्वेच्या वीजवाहिन्यांमधील वीज ः २५ हजार व्होल्ट किंवा २५ केव्ही
  • शहरातील उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांमधील वीज ः ११ हजार, २२ हजार, ३३ हजार ते ६६ हजार व्होल्ट किंवा ११, २२, ३३ ते ६६ केव्ही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Shalarth ID Scam : शिक्षण क्षेत्रात खळबळ! ३ लाख शिक्षकांच्या शालार्थ आयडीची एसआयटी चौकशी सुरू

Kamakhya Temple Controversy : नाशिकमध्ये 55 कोटींचं साम्राज्य! कोण आहे हा 'बडे बाबा'? ज्याच्या कामाख्या मंदिरावर 'अंनिस'ने ओढले ताशेरे; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

नाना पाटेकरांनी स्वत:च्या हाताने अभिनेत्रीसाठी बनवलं जेवण, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'माझ्यासाठी त्यांनी...' Viral Video

Latur News: युद्धामुळे आता बांधकामेही ‘गॅस’वर; सिलिंडरअभावी टाइल्सची निर्मिती ठप्प, लोखंडही महागले

SCROLL FOR NEXT