Naresh Mhaske
Naresh Mhaske Sakal media
मुंबई

"पोलीस कुटुंबियांचे पुनर्वसन झाल्याशिवाय तडकाफडकी त्यांना बाहेर काढू नये"

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : ठाण्यातील पोलिस वसाहतीमध्ये (Police society) राहणाऱ्या कुटुंबीयांना तडकाफडकी घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पोलिस कुटुंबियांच्या पुनर्वसनासंदर्भात (Police family rehabilitation) मार्ग काढण्याच्या दृष्टीने पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार माजी महापौर नरेश म्हस्के व माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी पोलिस आयुक्त जयजीत सिंग व पोलिस उपायुक्त प्रवीण पवार यांची पोलिसांच्या कुटुंबियांसमवेत भेट घेतली. पोलिस कुटुंबियांचे पुनर्वसन झाल्याशिवाय तडकाफडकी त्यांना बाहेर काढू नये, असा निर्णय या वेळी घेण्यात आल्याचे (Naresh Mhaske) नरेश म्हस्के यांनी सांगितले.

पोलिस वसाहतीच्या इमारतींची बांधकाम विभागाकडून निगा न राखली गेल्यामुळे त्या जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे जवळजवळ ६५० कुटुंबियांना अचानकपणे घरे रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. अचानक घर खाली करण्याच्या विचारामुळे येथील पोलिस कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका कार्यक्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी पोलिस वसाहतीतील घरे रिकामी आहेत, त्या ठिकाणी संबंधितांचे पुनर्वसन करावे.

उर्वरित पोलिस कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यासाठी एमएमआरडीए व म्हाडा प्राधिकरणामधील उपलब्ध सदनिका ताब्यात घेण्यात याव्यात. तसेच जे पोलिस कर्मचारी स्वत:च्या सदनिकेमध्ये जाऊ इच्छ‍ितात त्यांना त्यांच्या पगारात घरभाडे भत्ता लागू करण्यात यावा, अशी चर्चा या बैठकीदरम्यान करण्यात आल्याचे नरेश म्हस्के यांनी सांगितले. ज्या इमारती दुरुस्त करून राहण्यास योग्य आहेत अशा इमारतींचे व्हीजेटीआयमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आल्याचेही म्हस्के यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Tampering Case: वायकरांच्या मेहुण्यापाठोपाठ ठाकरे गटाचे आमदार देखील अडचणीत, फेरमतमोजणी प्रकरणी नवा ट्विस्ट

Latest Marathi Live Updates : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दोन प्रभारींची नियुक्ती; वैष्णव आणि यादव यांच्यावर जबाबदारी

T20 WC 2024 Super 8 Weather Forecast : वर्ल्ड कप जिंकण्याचे कर्णधार रोहितचे स्वप्न जाणार वाहून? 'सुपर-8'वर वरुणराजाची टांगती तलवार

New Zealand PMs: जपानला जाताना न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे विमान झालं खराब, मग असा पूर्ण केला प्रवास

Smartphone Tips : मोबाईल सर्व्हिस सेंटरला देताना करू नका 'या' चुका; होऊ शकतं मोठं नुकसान,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT