Doctor  
मुंबई

आयुर्वेदिक निवासी डॉक्टर 5 महिने वेतनाविना; डॉक्टरांकडून आंदोलनाचा इशारा

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोना योद्धा म्हणून आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर रूग्णांची सेवा करत आहेत. या आयुर्वेदीक निवासी डॉक्टरांना गेले पाच महिने वेतन मिळाले नाही. डॉक्टरांना लवकरात लवकर वेतन मिळाले नाही तर आंदोलन कऱण्याचा इशारा ही त्यांनी दिलेला आहे.

राज्यात मुंबई, नागपूर, नांदेड आणि उस्मानाबाद या चार आयुर्वेदिक महाविद्यालयात 560 निवासी डॉक्टर असून हे सर्व डॉक्टर्स कोरोना महामारीच्या विरोधात सरकारच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. चारही शहरात हे डॉक्टर फक्त कोरोनाच्या संशयित रुग्णांच्या कोरोना चाचणीचेच काम करत नाहीत, तर हे गरजेनुसार विविध रुग्णालयातील कोविड वॉर्डात आणि कोविड केअर सेंटरमध्येही आपले कर्तव्य पार पाडत आहेत. असे असतानाही आयुर्वेदिक निवासी डॉक्टरांना एप्रिल महिन्यांपासून त्यांचे विद्या वेतन मिळालेले नाही. त्यामुळे राज्य सरकार कोविड योद्धा संबोधून ज्यांचे गौरव करते. मात्र त्यांना त्यांच्याच हक्काचे विद्यावेतन देण्यास सरकारला कसा काय विसर पडतो आहे, असा सवाल होमियोपॅथी काउंसीलने उपस्थित केला आहे.

सध्या कोरोना महामारीचा काळ आहे. राज्यात साथ रोग कायदा लागू आहे. डॉक्टर म्हणून आमचे काही कर्तव्य आहे. म्हणून गेले 5 महिने विद्या वेतन न घेता आम्ही काही न बोलता आपली सेवा देत आहोत. मात्र, विद्या वेतनाशिवाय किती काळ काम करणार असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. नुसते कोविड योद्धा संबोधून सरकार किती दिवस काम करून घेणार, असा प्रश्न काउंसीनलने उपस्थित केला आहे.

एमबीबीएस आणि डेंटलसह इतर अभ्यास श्रेणीतील निवासी डॉक्टरांचे विद्या वेतन नुकतेच राज्य सरकारने दहा हजारांनी वाढवले आहे. मात्र त्यावेळीही आयुर्वेद विभागातील निवासी डॉक्टरांना त्यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे आयुर्वेदिक निवासी डॉक्टरांवरच अन्याय का? असा सवाल निवासी डॉक्टरांकडून विचारला जात आहे.

राज्य शासनाने जर आमच्या मागण्याकडे लक्ष दिले नाही तर लवकरच चारही महाविद्यालयातील सर्व डॉक्टरांना आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा देण्यात आला आहे. महामारीच्या संकटात आंदोलन करण्याची आमची मानसिकता नाही. मात्र, सरकार आम्हाला भाग पाडणार असेल तर आमच्या पुढे दुसरा पर्याय राहणार नाही, असे ही काउंसील तर्फे सांगण्यात आले आहे.

आयुर्वेदिक निवासी डॉक्टरांचे मानधन देण्याबाबत निर्णय झाला आहे. लवकरच राज्य सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून विद्यार्थ्यांना मानधन देण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न लिहिण्याच्या अटीवर दिली आहे.

होमीयोपॅथी काउंसीलचे उपाध्यक्ष डॉ.अजित फुंडे म्हणाले, सर्व डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून कोरोना संकटात विरोधात लढत आहेत. अशा वेळी डॉक्टरांमध्ये भेदभाव करणे चुकीचे आहे. सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढून आयुर्वेदीक विद्यार्थ्यांचे मानधन मुक्त करावे.
 
संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Rate: सर्वसामान्यांना पुन्हा झटका? पेट्रोल-डिझेलचे दर ५ रुपयांनी वाढण्याची शक्यता; भाववाढीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा

New Fuel Launch: E85 इंधन आलं पण तुमच्या E20 आणि पेट्रोल गाडीचं काय होणार? सरकारने दिलं स्पष्टीकरण

India A Squad: भारत अ संघाची घोषणा! ध्रुव जुरेलकडे मोठी जबाबदारी, 'या' युवा वेगवान गोलंदाजाची लागली लॉटरी

Transgenders Scheme: तृतीयपंथीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय, व्यवसायासाठी २ लाख मिळणार; कसा लाभ घेता येणार?

Shreyas Iyer अडीच वर्षे T20I संघातून बाहेर असूनही का झाला थेट टीम इंडियाचा कॅप्टन? अजित आगरकरांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT