मुंबई शहराला पडलीये ग्रामीण भागाची गरज! पालिका मागवणार तज्ज्ञ डॉक्‍टर... 
मुंबई

मुंबई शहराला पडलीये ग्रामीण भागाची गरज! पालिका मागवणार डॉक्‍टर...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी ग्रामीण भागातील डॉक्‍टर मुंबईत येण्याची शक्‍यता आहे. मे महिन्यांच्या अखेरपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या अनेक पटींनी वाढण्याची शक्‍यता असल्याने मुंबई महापालिका हा विचार करत आहे. 

सार्वजनिक रुग्णालयांतील अपुऱ्या मनुष्यबळामुळे महापालिकेने तज्ज्ञ व एमबीबीएस डॉक्‍टर कंत्राटी पद्धतीने नेमण्याचा निर्णय घेतला होता. तज्ज्ञ डॉक्‍टरांना दरमहा साडेतीन लाख रुपयांपर्यंत मानधन देण्याची तयारीही महापालिकेने दाखवली होती. परंतु त्यासाठी अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. 
कंत्राटी पद्धतीवरील नियुक्तीला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे महापालिकेने आता नवा पर्याय पुढे आणला आहे. त्यानुसार जिल्हा सार्वजनिक रुग्णालयांमधील डॉक्‍टरांना मुंबईत बोलावून घेण्याचा विचार प्रशासन करत आहे. महानगरे आणि शहरी भागांत कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत. कोरोनाचे अत्यल्प रुग्ण असलेल्या किंवा रुग्ण नसलेल्या जिल्ह्यांतून डॉक्‍टरांना मुंबईत आणण्याचा महापालिकेचा विचार आहे. 

परिचारिका, वॉर्डबॉयचीही गरज 
मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईत कोरोनाचे 70 हजार रुग्ण आढळण्याची शक्‍यता आहे. विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच राहणार असल्याने रुग्णांवरील उपचारांसाठी मोठ्या संख्येने डॉक्‍टर, परिचारिका, वॉर्डबॉय आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. कोरोनाच्या बळींमध्ये इतर आजार असलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे महापालिकेला तज्ज्ञ डॉक्‍टरांचीही मोठ्या प्रमाणात आवश्‍यकता आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake reasons: महाराष्ट्रात 16 दिवसांमध्ये 29 भूकंप! काय आहेत कारणं? मुंबईला धोका आहे का? तज्ज्ञ काय सांगताएत?

जलपर्णीतून बायोसीएनजी, प्लास्टिकमधून क्रूड ऑइल...गडकरींनी प्रदुषणावर सांगितला उपाय

Auric Land Row: ऑरिक विस्तारासाठी भूसंपादनाविरोधात सहा गावांचा एल्गार; शासनाच्या माहितीपत्रकांची होळी, निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

Marathi News Live Updates : पुण्यात भीषण अपघात, डंपरची दुचाकीला धडक, संतप्त नागरिकांचा भावडी रोडवर रास्ता रोको

Sukhapuri Tragedy: सुखापुरीत विजेच्या धक्क्याने वानर पिल्लाचा मृत्यू; कळपाचा शोक, गावकऱ्यांचा अंत्यसंस्कारातून माणुसकीचा संदेश

SCROLL FOR NEXT