Dombivali Blast sakal
मुंबई

Dombivali Blast : ...अन् जो तो सैरावैरा पळू लागला‌! डोंबिवलीतील स्फोटामुळे नागरिक भयभीत

दुपारी दोन वाजताची वेळ. सर्वत्र शांतता असताना अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणांत आगीचा मोठा लोळ उंचच उंच उडाला.

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली (जि. ठाणे) - दुपारी दोन वाजताची वेळ. सर्वत्र शांतता असताना अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणांत आगीचा मोठा लोळ उंचच उंच उडाला. सर्वत्र धूरच धूर दिसत होता. दोन ते तीन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात स्फोटाचे हादरे बसले.

स्फोटाची तीव्रता एवढी होती की, दुकाने, घरांवरचे लोखंडी रॉड उडून मोठे नुकसान झाले. काचा फुटून त्या अंगावर पडल्याने अनेक जण जखमी झाले. तीन ते चार किलोमीटरवरील डोंबिवली रेल्वे स्थानकही हादरले. नेमके काय झाले आहे, हे कुणालाच कळत नव्‍हते. जो तो सैरावैरा पळत होता. कुणाचे डोके फुटले होते, तर कुणाचा हात तुटला होता. २६ जखमीना एम्स रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासाठी रक्तदान केले.

धुरामुळे दमछाक

कल्याण-डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दहा ते बारा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या; मात्र प्रचंड प्रमाणात धूर पसरलेला असल्याने कोणत्या कंपनीला आग लागली आहे, किती कंपन्यांचा आगीने ताबा घेतला आहे, याचा अंदाजच येत नव्‍हता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची मोठी दमछाक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT