Rajan Bhosale sakal
मुंबई

Dombivali News : काँग्रेस प्रदेश सचिव राजन भोसले यांनी केले स्वतःचे हसू; सगळेच झाले हैराण

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा मेळावा कल्याण येथे पार पडला. मात्र या मेळाव्या दरम्यान काग्रेसच्या एका नेत्याने स्वतःचेच हसू करून घेतले आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा मेळावा कल्याण येथे पार पडला. मात्र या मेळाव्या दरम्यान काग्रेसच्या एका नेत्याने स्वतःचेच हसू करून घेतले आहे.

राजन भोसले हे कल्याण जिल्हा प्रभारी आणि प्रदेश सचिव आहे. त्यांनी त्यांच्या भाषणा दरम्यान पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे. आजचा दिवस महान आहे अशी सुरुवात केली. मात्र महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी यांनी त्यांना हटकले. हे ऐकून मंचावर बसलेले नाना पटोले यांच्यासह नेते आणि पदाधिकारी हैराण झाले.

कल्याणमध्ये बुधवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने अत्रे रंगमंदिरात पक्षाचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित होते. या मेळाव्यास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली हेती.

सभागृह खच्चून भरले होते. अनेकांना तर बसायला जागा मिळाली नाही. यावेळी कल्याण जिल्हा प्रभारी आणि प्रदेश सचिव राजन भोसले यांनी भाषणाला सुरुवात केली. मित्रांनो आज आपल्याकडे महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी राजीव गांधी यांची हत्या झाली होती.

राजीव गांधी याचा आज स्मृती दिवस असल्याने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. अशा दूरदृष्टी नेत्यामुळेच असे बोलत असताना महिला जिल्हाध्यक्षा कांचन कुलकर्णी या त्यांनी त्यांना हटकले. त्या त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, आज स्मृती दिन नाही. तेव्हा लगेच भोसले यांनी त्यांची चूक सुधारत राजीव गांधी यांचा स्मृती दिन 21 मे रोजी असतो असे सावरुन घेतले.

काँग्रेसच्या प्रदेश सचिवला गांधीचा स्मृती दिन कोणता हे माहिती नसल्याने मंचावरील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते हैराण झाले. प्रदेश सचिव भोसले यांनी त्यांच्या भाषणात स्वतःचे हसू करून घेतले असून त्यांचे हे भाषण चर्चेचा विषय झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT